एटीएममध्ये चोरी करायला गेलेला, मात्र, स्वत:च्याच चुकीमुळे फसला, त्याचा डाव उलटला त्याच्यावरच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 16:25 IST2021-08-09T16:23:32+5:302021-08-09T16:25:36+5:30
एटीएममध्ये चोरी करायला गेलेला चोर एटीएममध्ये घुसला खरा. पण त्याच्याचुकीमुळे पोलिसांच्या हाती पकडला गेला. सोशल मिडियावर त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

एटीएममध्ये चोरी करायला गेलेला, मात्र, स्वत:च्याच चुकीमुळे फसला, त्याचा डाव उलटला त्याच्यावरच...
एटीएममध्ये (ATM) चोरी करायला गेलेला चोरएटीएममध्ये घुसला खरा. पण त्याच्याचुकीमुळे पोलिसांच्या हाती पकडला गेला. सोशल मिडियावर त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. (man got stuck between wall and ATM during the theft, police caught him)
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, ही घटना तामिळनाडूमधील नमक्कल जिल्ह्यातील अनियापुरम येथे गुरुवारी घडली. या घटनेतील आरोपी एम. उपेंद्र रॉय चोरी करण्याच्या बहाण्याने रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी एटीएममध्ये घुसला. त्याने एटीएमच्या भींतीवर लावलेली लाकडी फळी तोडली आणि तो एटीमच्या मागील बाजूने आत शिरला. त्याने दगडाने एटीएम तोडायला सुरुवात करताच आजूबाजूच्या लोकांनी हा आवाज ऐकला. त्यांनी त्वरित पोलिसांना कळवलं.
पोलिस पोहोचताच त्यांनी पाहिलं की उपेंद्र दारुच्या नशेमध्ये आहे आणि तो एटीएम आणि भींतीच्या मध्ये अडकलेला आहे. पोलिसांनी सध्या त्याची रवानगी न्यायलयीन कोठडीमध्ये केली आहे.