इलेक्ट्रिक कटरनं कापला! १२ तुकड्यात आढळला दुसऱ्या पत्नीचा मृतदेह; पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 02:07 PM2022-12-18T14:07:58+5:302022-12-18T14:08:09+5:30
रुबिका पहाडिया ही दिलदार अन्सारीची दुसरी पत्नी होती. गेल्या २ वर्षांहून अधिक काळ ते एकमेकांना ओळखत होते
साहिबगंज - राजधानी नवी दिल्लीतील 'श्रद्धा वालकर हत्याकांड' अजूनही लोक विसरलेले नाहीत तोवरच आता झारखंडमधील साहिबगंजमधून असेच एक हृदयद्रावक प्रकरण समोर आलं आहे. जिल्ह्यातील बोरीओ येथे २२ वर्षीय आदिवासी मुलीचे इलेक्ट्रिक कटरने १२ तुकडे करून फेकण्यात आले. आरोपी दुसरा कोणी नसून तिचा पती दिलदार अन्सारी आहे.
माहितीनुसार, दोघेही जवळपास दोन वर्षे एकत्र राहत होते. बोरीओ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी उशिरा संथाली मोमीन टोला येथील कच्चा घरातून महिलेचा मृतदेह १२ हून अधिक तुकड्यांमध्ये सापडला. तिच्या मानेसह शरीराच्या वरच्या भागाचे अनेक भाग अद्याप सापडलेले नाहीत. ज्यांचा शोध पोलीस पथक घेत आहेत.
एसपी अनुरंजन किस्पोट्टा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रूबिका पहारिया (२२ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे, ती बोरियो भागातील गोंडा पहार येथील रहिवासी आहे. पती दिलदार अन्सारी (25 वर्षे) याने तिची हत्या केली होती. मृत हे आदिम पहारिया जमातीचे होते, तर आरोपी एका विशिष्ट समाजातील होता. गेल्या दोन वर्षांपासून दोघेही एकाच छत्राखाली राहत होते. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
एसपीने पुढे सांगितले की, रुबिका पहाडिया ही दिलदार अन्सारीची दुसरी पत्नी होती. गेल्या २ वर्षांहून अधिक काळ ते एकमेकांना ओळखत होते. रुबिका गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती. बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. शनिवारी संध्याकाळी मोमिन टोलाच्या अंगणवाडी भवनाच्या मागे कुत्र्यांचा झुंड पाहायला मिळाला. जे मांसचे तुकडे खात होते. हे तुकडे मानवी शरीराचे असल्याचं कळताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास केला असता त्याठिकाणी छिन्नविछिन्न अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला. महिलेच्या मृतदेहाचे १२ तुकडे पोलिसांना सापडले त्यावरून हे इलेक्ट्रिक कटरने किंवा धारदार शस्त्राने कापल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणात पोलिसांनी पतीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.