गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून तिच्या नव्या बॉयफ्रेंडच्या भाच्याचं केलं अपहरण आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 01:25 PM2022-12-17T13:25:20+5:302022-12-17T13:25:46+5:30
Crime News : घटनेची माहिती मिळताच पोलीस मुलाचा शोध घेत होते आणि मथुरामधून मुलगा सुखरूप ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी आरोपीलाही अटक केली आहे.
Crime News : उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये एका तरूणाला त्याची गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून त्याने एका पाच वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं. हा मुलगा आरोपीच्या एक्स गर्लफ्रेंडच्या दुसऱ्या बॉयफ्रेंडचा भाचा होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस मुलाचा शोध घेत होते आणि मथुरामधून मुलगा सुखरूप ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी आरोपीलाही अटक केली आहे.
आरोपी भूपेंद्रने सांगितलं की, त्याच्या शेजारी राहणाऱ्या तरूणीसोबत त्याचं अफेअर होतं. त्यानंतर तरूणीने त्याच्यासोबत नातं तोडलं. तरूणी आता दुसऱ्या तरूणासोबत रिलेशनशिपमध्ये होती.
पोलिसांनी सांगितलं की, नगला देबजीतला राहणाऱ्या भूपेंद्रने कथित एक्स गर्लफ्रेंड आणि तिच्या नव्या बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी प्लान केला. भूपेंद्रने काही दिवस दोघांवर नजर ठेवली. नंतर एक्स गर्लफ्रेंडच्या नव्या बॉयफ्रेंडच्या भाच्याचं अपहरण करण्याचं प्लानिंग केलं.
आरोपी भूपेंद्रने मुलाला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलवलं आणि त्याचं अपहरण करून त्याला मथुरा इथे घेऊन गेला. तिथे मुलाला एका घरात बंद केलं. त्यानंतर कुटुंबियांनी मुलाचा शोध घेणं सुरू केलं. पण त्याचा काही पत्ता लागला नाही. नंतर पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी काही तासांमध्येच मुलाचा शोध लावला.
एसपी सिटी यांनी सांगितलं की, आरोपी भूपेंद्र विरोधात केस दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं.