विवाहित प्रेयसीला मिळवण्यासाठी तिच्या पतीचं केलं अपहरण, फोनवरूनच देण्यास सांगितला तीन तलाक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 05:26 PM2022-07-07T17:26:21+5:302022-07-07T17:27:21+5:30

UP Crime News : इतकंच नाही तर अपहरण केल्यावर रस्त्यातूनच पत्नीला फोन करून तीन तलाक दिल्याचंही सांगण्यास सांगितलं. या घटनेत आरोपीच्या मित्रांचाही समावेश होता.

Man kidnap married lover's husband, video goes viral police arrested in Uttar Pradesh | विवाहित प्रेयसीला मिळवण्यासाठी तिच्या पतीचं केलं अपहरण, फोनवरूनच देण्यास सांगितला तीन तलाक

विवाहित प्रेयसीला मिळवण्यासाठी तिच्या पतीचं केलं अपहरण, फोनवरूनच देण्यास सांगितला तीन तलाक

Next

UP Crime News : उत्तर प्रदेशच्या भदोहीमधून एक हैराण करणारी घटना  समोर आली आहे. इथे एका माथेफिरू प्रियकराने विवाहित प्रेयसीला मिळवण्यासाठी तिच्या पतीचं अपहरण केलं. इतकंच नाही तर अपहरण केल्यावर रस्त्यातूनच पत्नीला फोन करून तीन तलाक दिल्याचंही सांगण्यास सांगितलं. या घटनेत आरोपीच्या मित्रांचाही समावेश होता.

घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. ज्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आणि अपहरण करण्यात आलेल्या तरूणाची सुटका केली.

पोलिसांनी सांगितलं की,  आरोपींनी जौनपूरहून भदोहीला येऊन हे कृत्य केलं. रिजवान नावाच्या तरूणाचं दोन महिन्यापूर्वीच जौनपूर जिल्ह्यातील तरूणीसोबत लग्न झालं होतं. या तरूणीसोबत मुअज्जाम नावाच्या तरूणाचं प्रेम प्रकरण होतं. तिच्या विवाहानंतर त्याला ती परत हवी होती. त्यामुळे त्याने तीन मित्रांसोबत मिळून रिजवानच्या अपहरणाचा प्लान केला. 

नंतर त्यांच्याकडून तीन तलाक बोलवून घेतलं. सोबतच त्याच्या सासऱ्यांना फोन करून सांगायला लावलं की, तुमच्या मुलीला तुमच्याकडेच ठेवा. माझ्या घरी पाठवण्याची गरज नाही. तसेच आरोपीने रिजवानला धमकी दिली की, पोलिसांना सांगितलं की, कुटुंबाची हत्या करू.

तेच याप्रकरणी रिजवानने पोलिसांना सांगितलं की, तो खूप घाबरला होता. त्यामुळे त्याने पत्नीला तीन तलाक दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच कारचा  नंबर समजला होता. पोलीस लगेच सक्रिय झाले आणि त्यांनी आरोपींना अटक केली. पोलीस आता पुढील कारवाई करत आहेत.

Web Title: Man kidnap married lover's husband, video goes viral police arrested in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.