साखरपुड्यानंतरही तरूणीचं सुरू होतं अफेअर, होणाऱ्या पतीकडून लोखंडी रॉडने प्रियकराची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 03:09 PM2021-05-05T15:09:29+5:302021-05-05T15:10:33+5:30
Jodhpur Crime News : आरोपी तरूणाचा साखरपुडा झाला होता. मात्र, त्यानंतर त्याला कळालं की, त्याच्या होणाऱ्या पत्नीची एका तरूणासोबत अफेअर सुरू आहे.
राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूरमधून (Jodhpur) एका हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे प्रेमप्रकरणातून एका तरूणाची हत्या (Jodhpur Murder) करण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, आरोपी तरूणाचा साखरपुडा झाला होता. मात्र, त्यानंतर त्याला कळालं की, त्याच्या होणाऱ्या पत्नीची एका तरूणासोबत अफेअर सुरू आहे. यामुळे संतापलेल्या तरूणाने होणाऱ्या पत्नीच्या बॉयफ्रेन्डची हत्या केली.
ही घटना जोधपूरच्या चौपासनी हाउसिंग बोर्ड भागातील आहे. इथे मंगळवारी सायंकाळी एका तरूणाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक करून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. असे सांगितले जात आहे की, हत्येचा आरोपी टहला भीलचा काही दिवसांपूर्वीच खाखरपूडा झाला होता. नंतर त्याला समजलं की, नरेश भील त्याच्या होणाऱ्या बायकोला फोन करतो आणि त्यांच्यात काहीतरी सुरू आहे. त्यानंतर त्याने नरेश भीलला एक-दोनदा समजावलं की, माझ्या होणाऱ्या पत्नीपासून दूर रहा. (हे पण वाचा : अरे देवा! एकाच तरूणीच्या प्रेमात पडले दोन पाकिस्तानी गुंड, लग्नास नकार दिला म्हणून केली हत्या...)
मात्र, नरेश काही ऐकायला तयार नव्हता. तो तिला पुन्हा पुन्हा करून तिच्याशी बोलत होता. याची माहिती आरोपीला मिळाली तर त्याने पुन्हा नरेशला समजावलं. मंगळवारी दोघे आसनेसामने आले तेव्हा लोकांनी त्यांचा वाद मिटवला. दुपारी आरोपीला माहिती मिळाली की, नरेश चौपासनी हाउसिंग बोर्डच्या १८ सेक्टर येथील राज क्लीनिकमध्ये आहे. टहला तिथे पोहोचला आणि त्याने क्लीनिकमध्ये घुसून लोखंडी रॉडने नरेशवर वार केले. नरेश तिथेच खाली पडला. (हे पण वाचा : धक्कादायक! प्रियकराशी बांधायची होती लग्नगाठ, म्हणून नियोजित वरावर केला विषघात)
क्लीनिकच्या मालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी येऊन मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली. मृत नरेश हा पाक विस्थापित हिंदू आहे. आरोपी टहला सुद्धा पाक विस्थापित हिंदू आहे. घटनेनंतर पोलिसांनी मृतकाच्या घरी माहिती दिली. तर क्लीनिकमधील सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी कारवाई केली.