धक्कादायक! पुतण्याने चुलतीची हत्या करून मृतदेहाचे केले 10 तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 06:53 PM2022-12-17T18:53:32+5:302022-12-17T18:53:59+5:30

दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणासारखे  प्रकरण राजस्थानची राजधानी जयपूरमधून समोर आले आहे.

man killed his aunt in jaipur using hammer cut body into pieces with marble cutter like shraddha walker murder | धक्कादायक! पुतण्याने चुलतीची हत्या करून मृतदेहाचे केले 10 तुकडे

धक्कादायक! पुतण्याने चुलतीची हत्या करून मृतदेहाचे केले 10 तुकडे

Next

दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणासारखे  प्रकरण राजस्थानची राजधानी जयपूरमधून समोर आले आहे. स्वत:च्या चुलतीची हत्या करुन मृतदेहाचे 10 तुकडे करून जंगलात फेकल्याचे समोर आले आहे. ही खळबळजनक घटना जयपूरच्या विधाधर नगर पोलीस ठाणे परिसरातील आहे. या प्रकरणाचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

अनुज शर्मा उर्फ ​​अचिंत्य गोविंद दास असे आरोपीचे नाव आहे. अनुजला दिल्लीला जायचे होते पण आती त्याच्या निर्णयावर नाराज होत्या. त्यांनी त्याला दिल्लीला जाऊ दिले नाही, त्यामुळे तो संतापला आणि रागाच्या भरात आतीला हातोड्याने मारले. मृत महिला कर्करोगाने त्रस्त होती.  कोविड काळात आरोपीच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

उच्चभ्रू समाजातील महिलांसोबत सेक्स करण्यासाठी पैशाची ऑफर; गुन्हा दाखल, नेमका प्रकार काय?

आरोपी अनुज उर्फ ​​गोविंद दास काही दिवसापासून इस्कॉनशी संबंधित होता. त्याने इस्कॉनमधून दीक्षाही घेतली होती. हत्या करण्यापूर्वी त्याला कीर्तनासाठी दिल्लीला जायचे होते. पण दिल्लीला कीर्तनाला गेल्याचा राग आल्याने चुलतीने त्याला जाण्यापासून रोखले. यानंतर त्याने चुलतीची हत्या केली.

हातोड्याने तिची हत्या केल्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी अनुजने मार्बल कटरने ताईच्या मृतदेहाचे 8 ते 10 तुकडे केले आणि मृतदेहाचे तुकडे ट्रॉली बॅगमध्ये टाकून दिल्ली रोडजवळील जंगलात फेकून दिले. यानंतर त्याने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन चुलती हरवल्याची तक्रार दाखल केली.

मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर तो दिल्लीच्या निर्जन भागात फेकण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
 

Web Title: man killed his aunt in jaipur using hammer cut body into pieces with marble cutter like shraddha walker murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.