फोनवर रात्री कुणासोबत तरी बोलत होती विधवा वहिनी, दीराने उचललं धक्कादायक पाउल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 01:35 PM2022-07-26T13:35:05+5:302022-07-26T13:35:22+5:30
Crime News : महिलेला तीन मुलं आहेत आणि 11 महिन्यांआधी तिच्या पतीचं एका अपघतात निधन झालं होतं. हत्येच्या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्यानंतर चौकशी सुरू केली.
Crime News : गाजियाबादच्या लोनीमधून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका दीराने त्याच्या विधवा वहिनीच्या डोक्यात हातोथा मारून तिची हत्या केली. असं सांगितलं जात आहे की, महिलेला तीन मुलं आहेत आणि 11 महिन्यांआधी तिच्या पतीचं एका अपघतात निधन झालं होतं. हत्येच्या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्यानंतर चौकशी सुरू केली.
पोलिसांनी आरोपी दीराला अटक केली आहे. चौकशी त्याने सांगितलं की, त्याची वहिनी रात्रीच्या वेळी अनोळखी लोकांसोबत फोनवर बोलत होती. जे घरातील कुणालाही आवडत नव्हतं. अनेकदा तिला समजावण्यात आलं, पण तिने काही ऐकलं नाही. यावरून घरात अनेकदा वाद होत होता. आरोपीला संशय होता की, त्याच्या वहिनीचं एका तरूणासोबत अफेअर सुरू आहे. रात्री उशीरा साधारण एक वाजता आरोपी दीर अभिषेक हातोडा घेऊन वहिनीच्या रूममध्ये गेला आणि तिच्या डोक्यावर व चेहऱ्यावर अनेक वार करत तिचा जीव घेतला.
कुटुंबियांनी सांगितलं की, आरोपीचा मोठा भाऊ गौरव आणि 23 वर्षीय ट्विंकलचं लग्न सप्टेंबर 2017 मध्ये झालं होतं. साधारण 11 महिन्याआधी मुरादनगरमध्ये एका अपघतात गौरवचं निधन झालं होतं. ज्यानंतर ट्विंकल आपल्या तीन मुलांसह आपल्या सासरीच राहत होती.
गौरवच्या मृत्यूनंतर आरोपी दीर त्याच्या वहिनीकडे सतत संशयाच्या दृष्टीनेच बघत होता. ती दुसऱ्या कुणासोबत तरी फोनवर बोलत होती. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला हातोडा ताब्यात घेतला. पोलीस इन्शुरन्सच्या अॅंगलनेही प्रकरणाची चौकशी करत आहेत.