शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने वाद; महिलेचा खून करुन मृतदेह 4 दिवस गाडीत ठेवला, असा झाला खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 03:41 PM2022-11-21T15:41:52+5:302022-11-21T15:43:27+5:30

छत्तीसगडच्या बिलासपूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

Man killed his friend after he losses in the stock market; kept body in car for 4 days in bilaspur | शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने वाद; महिलेचा खून करुन मृतदेह 4 दिवस गाडीत ठेवला, असा झाला खुलासा...

शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने वाद; महिलेचा खून करुन मृतदेह 4 दिवस गाडीत ठेवला, असा झाला खुलासा...

Next


बिलासपूर:छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये एका व्यक्तीने महिलेचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह चार दिवस कारमध्येच ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेह ठेवलेल्या कारमधून दुर्गंधी येऊ लागल्याने रविवारी ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बिलासपूरच्या टिकरापारा भागात भाड्याच्या घरात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. आरोपीची महिलेशी आधीपासूनच मैत्री होती. दोघांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. यादरम्यान, आरोपीचे नुकसान झाले आणि पैशाच्या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.

आरोपीने पोलिसांना सांगितले की. ही महिला त्याच्यावर पैशासाठी दबाव आणत होती आणि यावरून त्यांच्यात सतत भांडण व्हायचे. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये भांडण झाले, त्यानंतर आरोपीने शहरातील दयालबंद परिसरात पीडितेचा गळा दाबून खून केला. यानंतर मृतदेह गाडीत टाकून कस्तुरबा नगर येथील त्यांच्या घरी आणला. चार दिवसांनी गाडीतून मृतदेहाचा दुर्गंधी येऊ लागला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बंद कारमधून मृतदेह बाहेर काढला आणि आरोपीला ताब्यात घेतले. 

Web Title: Man killed his friend after he losses in the stock market; kept body in car for 4 days in bilaspur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.