शरीरसंबंधास नकार दिल्यानं पतीकडून पत्नीची गोळ्या झाडून हत्या; ३ मुलांना कालव्यात फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 12:29 PM2021-05-27T12:29:56+5:302021-05-27T12:30:51+5:30

१५ दिवसांपासून शरीरसंबंधास नकार देत असल्यानं पत्नीची निर्घृण हत्या; कालव्यात फेकलेली मुलं बुडाल्याची भीती

Man Killed Wife And His Three Children In Muzaffarnagar Of Uttar Pradesh | शरीरसंबंधास नकार दिल्यानं पतीकडून पत्नीची गोळ्या झाडून हत्या; ३ मुलांना कालव्यात फेकलं

शरीरसंबंधास नकार दिल्यानं पतीकडून पत्नीची गोळ्या झाडून हत्या; ३ मुलांना कालव्यात फेकलं

Next

मुझफ्फरनगर: उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका ३७ वर्षीय व्यक्तीनं त्याच्या पत्नीची गोळी झाडून हत्या केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून पत्नीनं शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानं नाराज झालेल्या पत्नीनं पतीचा खून केला. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीनं स्वत:च्या ३ मुलांना कालव्यात फेकलं. मुझफ्फरनगरमधील बसेडी गावात ही घटना घडली. या मुलांचा शोध अद्याप लागलेला नाही.

पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 'पत्नी १५ दिवसांपासून शरीरसंबंधास नकार देत होती. सकाळी तिनं न ऐकल्यास तिची हत्या करायची असा निश्चय आदल्या रात्रीच केला होता आणि तेच झालं. सकाळी पत्नीनं जवळ येण्यास नकार दिला. त्यामुळे तिची गोळी झाडून हत्या केली,' अशी माहिती पतीनं चौकशीदरम्यान पोलिसांना दिली.

पत्नीची हत्या केल्यानंतर पती मुलांना घेऊन कालव्याजवळ पोहोचला. पत्नीनंतर मुलांचं पालनपोषण कोण करणार, या विचारानं त्यानं मुलांना कालव्यात फेकून दिलं. सानिया, वंश आणि हर्षिता अशी या मुलांची नावं आहेत. यापैकी हर्षिता केवळ १५ महिन्यांची आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. त्याचं नाव पप्पू असं आहे. कालव्यात फेकण्यात आलेल्या मुलांचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप एकही मूल हाती लागलेलं नाही. पोलिसांनी पप्पूला तुरुंगात पाठवलं असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
 

Web Title: Man Killed Wife And His Three Children In Muzaffarnagar Of Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.