शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करत होती पत्नी, लग्नाच्या २ महिन्यांनंतर झाला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 10:34 AM2021-06-24T10:34:08+5:302021-06-24T10:36:17+5:30

आपल्या तक्रारीत पतीने सासरच्या लोकांनी त्याला लग्नावेळी अंधारात ठेवल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

Man lodge case against in laws after leans his wife is a transgender in Kanpur | शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करत होती पत्नी, लग्नाच्या २ महिन्यांनंतर झाला धक्कादायक खुलासा

शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करत होती पत्नी, लग्नाच्या २ महिन्यांनंतर झाला धक्कादायक खुलासा

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने ट्रान्सजेंडरसोबत लग्न लावून दिल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप लावत सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लग्नाच्या साधारण २ महिन्यांनंतर पत्नी ही ट्रान्सजेंडर असल्याचा खुलासा झाला आणि पतीच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या तक्रारीत पतीने सासरच्या लोकांनी त्याला लग्नावेळी अंधारात ठेवल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

India.com च्या एका रिपोर्टनुसार, कानपूरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं लग्न २८ एप्रिल २०२१ ला झालं होतं. तक्रारीत या व्यक्तीने दावा केला की, लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीने तब्येत ठीक नसल्याचं कारण सांगितलं आणि शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ राहिली. (हे पण वाचा : आई की वैरीण! अडीच लाखांसाठी एका आईने केली स्वत:च्या मुलीची हत्या, असा झाला खुलासा)

कसा झाला खुलासा?

पोलीस अधिकारी कुंज बिहारी मिश्रा यांनी सांगितलं की, 'कानपूरच्या शास्त्रीनगरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने पनकी भागातील एका महिलेसोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर नवरी नवरदेवासोबत शारीरिक संबंध ठेवू शकत नव्हती आणि तिने तब्येत ठीक नसल्याचं कारण दिलं. जसजसे दिवस गेले पतीला शंका आली की, काहीतरी गडबड आहे. त्यानंतर तो पत्नीला एका स्त्रीरोग तज्ज्ञांकडे घेऊन गेला. त्यानंतर हा खुलासा झाला की ती एक ट्रान्सजेंडर आहे.

पतीने आपली पत्नी, तिचे आई-वडील आणि मध्यस्थाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याने पुरावा म्हणून पत्नीचा मेडिकल रिपोर्ट पोलिसांसमोर सादर केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, 'व्यक्तीच्या सासरच्या लोकांसहीत आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरू असून त्या आधारावर कारवाई केली जाईल.
 

Web Title: Man lodge case against in laws after leans his wife is a transgender in Kanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.