खोटं लग्न करून म्हणाला- 'तू माझी पत्नी आहेस', मग काही महिने तिचा फायदा घेत राहिला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 11:00 AM2021-02-09T11:00:41+5:302021-02-09T11:03:17+5:30
ती ट्यूशनला जात होती. रस्त्यात आरोपीने तरूणीला जबरदस्तीने बाइकवर बसवलं आणि सिकंदरपूर येथील एका मंदिरात घेऊन गेला.
मुजफ्फरपूरच्या बोचहां पोलीस स्टेशन परिसरातून एक महिलेच्या फसवणुकीची घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीसोबत खोटं लग्न करून तिच्यासोबत अनेक महिने शारीरिक संबंध ठेवत होता. जेव्हा ही तरूणी गर्भवती झाली तेव्हा तिला मारझोड करून तो पळून गेला. पीडितेने SSP कडे कारवाईची मागणी केली आहे. तरूणीला महिला पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आलं असून चौकशी करून एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
आरोपीने तरूणीला सांगितले होते की, त्याच्याकडे खूप संपत्ती आहे. त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवलं. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरूणीला गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये भेटला होता. ती ट्यूशनला जात होती. रस्त्यात आरोपीने तरूणीला जबरदस्तीने बाइकवर बसवलं आणि सिकंदरपूर येथील एका मंदिरात घेऊन गेला. तिथे एक हार तिच्या गळ्यात टाकला आणि म्हणाला, 'आता तू माझी पत्नी आहेस'. (हे पण वाचा : धक्कादायक! अल्पवयीन मुलीचं २ वर्षे २० फायर फायटर्सकडून लैंगिक शोषण, महिलेच्या उलगड्याने खळबळ....)
यानंतर तरूणीने सासरी घेऊन जाण्यास सांगितले तर आरोपी तिला एका मित्राच्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने त्याच्या भांगेत कुंकू भरलं आणि जबरदस्ती तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने तिला इथे सात दिवस ठेवले. तरूणीने सासरी जाण्याचा तगादा लावल्याने तो तिला जवळच्या एका काकाकडे घेऊन गेला. त्याने तिला तिथे एक महिना ठेवले आणि शारीरिक संबंध ठेवले. तरूणी तरीही सासरी घेऊन जाण्यासाठी त्याने मागे लागली होती. तेव्हा त्याने तिला मारहाण केली. (हे पण वाचा : ब्रेकअपनंतर चिडलेल्या बॉयफ्रेन्डने दिली जीवे मारण्याची धमकी आणि नंतर केला हा कारनामा....)
दरम्यान तरूणी गर्भवती झाली आणि जेव्हा तिने ही बाब आरोपीला सांगितली तेव्हा तो तिला २७ जानेवारीला बाइकवर बसवून आखाडाघाट पुलावर घेऊन गेला. तिथे त्याने तिला गंडक नदीत धक्का देण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरडाओरड केली तेव्हा लोक जमा झाले. अशात आरोपी तेथून पळाला. कशीतरी तरूणी आरोपीच्या घरी पोहोचली तर त्यांनी तिचा स्वीकार करण्यास नकार दिला. इतकेच नाही तर तिला मारहाणही केली. आपला जीव वाचवून तरूणी ननिहाल पोहोचली. इथेच तिने पोलिसात तक्रार दिली. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहे.