कोरोनामुळे टेंशनमध्ये आलेल्या पत्नीला खूश करण्यासाठी दारूची पार्टी, चार महिलांसह पतीला अटक...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 10:18 AM2021-05-17T10:18:57+5:302021-05-17T10:21:11+5:30

पत्नीचं टेंशन दूर करण्यासाठी पतीने घरात चक्क दारूच्या पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीत त्याने मित्रांच्या चार पत्नींनाही बोलवलं होतं.

Man organize liquor party for wife in Ahmedabad, Police arrest man with four women | कोरोनामुळे टेंशनमध्ये आलेल्या पत्नीला खूश करण्यासाठी दारूची पार्टी, चार महिलांसह पतीला अटक...

कोरोनामुळे टेंशनमध्ये आलेल्या पत्नीला खूश करण्यासाठी दारूची पार्टी, चार महिलांसह पतीला अटक...

Next

गुजरातच्याअहमदाबादमध्ये (Ahmedabad Crime News) एका पतीला त्याच्या पत्नीला खूश करणं चांगलंच महागात पडलंय. या पतीसोबत इतर चार महिलांनाही तुरूंगावारी करण्यात आली. झालं असं की, या व्यक्तीच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. तिची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली. पण ती डिप्रेशनमध्ये होती. पत्नीचं टेंशन दूर करण्यासाठी पतीने घरात चक्क दारूच्या पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीत त्याने मित्रांच्या चार पत्नींनाही बोलवलं होतं. सगळेजण पार्टी एन्जॉय करत होते. तेव्हा अचानक पोलीस आले आणि सर्वांना अटक केली.

ही घटना थलतेज-शिलाज रोडवरील ग्रीन एवेन्यू मेपल काउंटी-१ येथील आहे. पोलिसांनी सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या पतीने सांगितले की, त्याला त्याच्या पत्नीचं टेंशन दूर करायचं होतं. म्हणून त्याने या पार्टीचं आयोजन केलं होतं. (हे पण वाचा : अवघ्या 100 रुपयांसाठी युवकाची हत्या; आरोपी महिलेला अटक, पती फरार)

पोलिसांना कुणी सांगितलं?

पोलिसांनी सांगितलं की पार्टी अपार्टमेंटच्या जी-३०१ फ्लॅटमध्ये सुरू होती. पार्टीत एका महिलेची सर्वांनी खिल्ली उडवली. ती संतापली होती. तिने हा सगळा प्रकार फोन करून पतीला सांगितला. पत्नीची खिल्ली उडवली गेल्याने नाराज पतीने पोलीस कंट्रोल रूमला फोन केला आणि या दारूच्या पार्टीची माहिती दिली.

पोलीस रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास इथे पोहोचले आणि सर्वांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पार्टी आयोजित करणारा केतन पटाडिया अडानी, अनुराधा गोयल(४०), शेफाली पांडे(३६) प्रियंका शाह(३१) आणि पायल लिंबाचिया(४०) यांचा समावेश आहे. (हे पण वाचा  : दीड वर्षाच्या बाळाचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी पुरलेला मृतदेह तपासणीसाठी काढला बाहेर)

होस्टच्या पत्नीला अटक केली नाही

केतन पटाडियाची पत्नी अमोला पटाडिया(४२) ला पोलिसांनी अटक केली नाही. कारण ती दारू प्यायली नव्हती. पोलिसांनी घटनास्थळावरून एक लीटर जॉनी वॉकर ब्लॅक लेबल व्हिस्कीची बॉटल ताब्यात घेतली. ज्यात १०० मिलिमीटर दारू शिल्लक होती. बाकी ते सगळे प्यायले होते.

जामिनावर सुटका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केतन पटाडिया हा हिरे व्यापारी आहे. ज्याचं ऑफिस मेमनगर फायर स्टेशनसमोर आहे. पोलिसांनी सांगितलं की, केतन पटाडिया आणि चार महिलांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.
 

Web Title: Man organize liquor party for wife in Ahmedabad, Police arrest man with four women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.