गळा चिरला, वाहतं रक्त प्यायलं अन्...; पत्नीच्या जवळ येणाऱ्याला पतीनं दिली थरकाप उडवणारी शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 12:11 PM2023-06-26T12:11:46+5:302023-06-26T12:14:00+5:30

या पतीने सर्वप्रथम 'त्या' व्यक्तीला जबर मारहाण केली, मग त्याचा गळा कापला आणि नंतर गळ्यातून वाहणारे रक्त प्यायले. महत्वाचे म्हणजे आरोपीने या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले.

man slits the throat drank the blood The husband gave a shocking punishment to the one who came close to his wife in Karnataka | गळा चिरला, वाहतं रक्त प्यायलं अन्...; पत्नीच्या जवळ येणाऱ्याला पतीनं दिली थरकाप उडवणारी शिक्षा!

गळा चिरला, वाहतं रक्त प्यायलं अन्...; पत्नीच्या जवळ येणाऱ्याला पतीनं दिली थरकाप उडवणारी शिक्षा!

googlenewsNext

कर्नाटकातील चिकबल्लापूर येथून अक्षरशः थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे पत्नीसोबतच्या वाढत्या जवळीकीमुळे नाराज झालेल्या पतीने एका व्यक्तीला एवढी  खतरनाक शिक्षा दिली की, तुमचाही थरकाप उडेल. या पतीने सर्वप्रथम 'त्या' व्यक्तीला जबर मारहाण केली, मग त्याचा गळा कापला आणि नंतर गळ्यातून वाहणारे रक्त प्यायले. महत्वाचे म्हणजे आरोपीने या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. मात्र, सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्याने 'त्या' व्यक्तीचा जीव वाचला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विजय असे आरोपीचे नाव असून मरेश जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मंड्यामपेट येथील व्यापारी विजय (३२) आणि मारेश (३०) हे एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. विजय गावोगाव जाऊन वस्तू विकायचा. यासाठी तो मारेशची टाटा एसी गाडी भाड्याने नेत असे. यादरम्यान मारेश आणि विजयच्या पत्नीची मैत्री झाली आणि दोघांमध्ये फोनवर बोलणे आणि चॅटिंगदेखील सुरू झाले. यासंदर्भात विजयने पत्नीसमोर नाराजीही व्यक्त केली होती.

नेमकं काय आणि कसं घडलं...?
नाराज विजयने यासंदर्भात आपला चुलत भाऊ असलेल्या जॉन बाबूसोबत चर्चा केली आणि मरेशचे वाहन घेण्यासंदर्भात प्लॅनिंग केली. यानंतर जेव्हा मरेश आपले वाहन घेऊन पोहोचला, तेव्हा विजय आणि बाबू मरेशला टमाटे दिखविण्यासाठी बाईकवर घेऊन गेले. मात्र, शेतात जाण्याऐवजी त्यांनी मरेशला निर्जनस्थळी नेले आणि त्याच्यावर हल्ला केला.

मृत समजून पळून गेले - 
माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलिसांनी म्हटले आहे की, विजयने मरेशवर एका छोट्या चाकूने हल्ला केला. त्याचा गळा कापला आणि गळ्यातून वाहणारे रक्त प्यायला सुरुवात केली. एवढेच नाही, तर त्याने बाबूला या घटनेचा व्हिडिओही शूट करायला सांगितले. यानंतर त्याने हा व्हिडिओ शेअरही केला. घटनेनंतर आरोपी मरेशला मेलेले समजून पळून गेले होते. यानंतर, काही लोक तेथे पोहोचले आणि त्यांनी मरेशला रुग्णालयात दाखल केले. 

Read in English

Web Title: man slits the throat drank the blood The husband gave a shocking punishment to the one who came close to his wife in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.