बोंबला! अंडरविअरमुळे दोन सहकाऱ्यांचा झाला वाद, एकाने चाकूने सपासप वार करत केली दुसऱ्याची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 03:53 PM2021-02-27T15:53:56+5:302021-02-27T15:56:38+5:30
Man Stabbed To Death In Kanpur over underwear : हत्येची ही घटना कानपूरच्या एका फॅक्टरीमध्ये झाली आहे. मृत व्यक्तीचं नाव विवेक आहे. तर आरोपी अजयने विवेक ची हत्या केली.
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) च्या कानपूर (Kanpur) मधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक अंडरविअर चोरी केल्याने एकाची हत्या करण्यात आली आहे. एका व्यक्तीने आपल्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तीची चाकूने केवळ या कारणाने हत्या (Man Stabbed To Death For Theft Of Underwear) केली कारण त्या व्यक्तीने याची अंडरविअर चोरी करून घातली होती.
यूपी पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, हत्येची ही घटना कानपूरच्या एका फॅक्टरीमध्ये झाली आहे. मृत व्यक्तीचं नाव विवेक आहे. तर आरोपी अजयने विवेक ची(Man Stabbed To Death In Kanpur) हत्या केली. आरोपी अजय आणि मृत विवेक एकाच रूममध्ये राहत होते. (हे पण वाचा : धक्कादायक! प्रेयसीची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रियकर बनला किडनॅपर, बर्गर स्टॉलवरून मुलाला उचललं आणि...)
मिळालेल्या माहितीनुसार, दुसरं कुणी आपली अंडरविअर वापरणं हे अजय पसंत नव्हतं. जेव्हा अजयला दिसले की, विवेकने त्याची अंडरविअर घातली तर तो संतापला आणि त्याने चाकूने त्याच्यवर हल्ला केला. पोलीस म्हणाले की, विवेक कुटुंबियांना त्याच्या हत्येची माहिती देण्यात आली आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. (हे पण वाचा : व्हॅलेंटाइन डे ला पत्नीच्या अफेअरचा झाला खुलासा, आधी पत्नीला दिलं गिफ्ट मग केली हत्या....)
अकबरपूरचे संदीप सिंह म्हणाला की, अजय विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजयला पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम बनवण्यात आल्या आहेत. पोलीस अजयला पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत आहे.
काय झालं त्या दिवशी?
सर्कल ऑफिसर संदीप सिंह म्हणाले की, 'त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, गुरूवारी अजयचा या मुद्द्यावरून विवेकसोबत मोठा वाद झाला होता. नंतर त्याने भाजी चिरायचा चाकू घेतला आणि विवेकवर सपासप वार केले. ज्यात विवेक गंभीरपणे जखमी झाला. नंतर अजय तेथून पळून गेला'. विवेकच्या सहकाऱ्यांनी त्याला जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तेथून त्याला लाल लजपतराय हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं होतं. पण तिथे पोहोचेपर्यंत त्याला मृत घोषित करण्यात आले.