धक्कादायक! एक्स गर्लफ्रन्डवर त्याने चाकूने केले ४७ वार, जीव जाईपर्यंत व्हिडीओ करत राहिला रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 01:19 PM2021-07-05T13:19:00+5:302021-07-05T13:20:49+5:30
त्याने महिलेचा मरतानाचा व्हिडीओही काढला. हा व्हिडीओ तो तिच्या शरीरातील रक्ताचा अखेरचा थेंब वाहून जाईपर्यंत रेकॉर्ड करत राहिला.
कॅनडातील Vancouver मधून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्ती इथे त्याच्या गर्लफ्रेन्डची फार निर्दयीपणे हत्या केली. या व्यक्तीने महिलेवर चाकूने ४७ सपासप वार केले. तो इतक्यावरच थांबला नाही तर तिच्या बाजूला उभा राहत तिला तडफडत मरताना बघत राहिला. त्याने महिलेचा मरतानाचा व्हिडीओही काढला. हा व्हिडीओ तो तिच्या शरीरातील रक्ताचा अखेरचा थेंब वाहून जाईपर्यंत रेकॉर्ड करत राहिला.
'द सन'मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, आपल्या एक्स गर्लफ्रेन्डची हत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे जेन. त्याने ३४ वर्षीय निकोलची निर्दयीपणे हत्या केली. निकोलला एक १० वर्षांचा मुलगा आहे. तो आता अनाथ झालाय. कोर्टाने याप्रकरणी जेनला १५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा भोगत असताना त्याला एकही पेरोल मिळणार नाही.
का केली हत्या?
पोलिसांनुसार, जेनला जेव्हा समजलं की, त्यांच्या ब्रेकअपनंतर निकोल दुसऱ्या व्यक्तीला डेट करत आहे तर तो संतापला होता. या कारणावरून त्याने निकोलवर सूड उगवण्याचा निश्चय केला होता. त्यानंतर एक दिवस तो निकोलला काही कारण सांगत सोबत घेऊन गेला आणि कारच्या मागच्या सीटवर त्याने तिची हत्या केली. जेनने निकोलवर चाकूने ४७ वार केले. ज्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला. (हे पण वाचा : अनैतिक संबंधातून वाल्हेकरवाडी महाराजाकडून व्यावसायिकाचा खून; अपघाताचा केला बनाव)
काय म्हणाले न्यायाधीश?
आरोपी जेनला शिक्षा सुनावताना न्यायाधीश म्हणाले की, हा फार गंभीर गुन्हा आहे. या घटनेनंतर असं वाटतं की, जेनमध्ये जणू काही भावनाच नाहीत. त्याचं निकोलवर कधी प्रेमही नव्हतं. कुणी इतकं निर्दयी कसं असू शकतं?. दरम्यान कोर्टात सुनावणीवेळी निकोलच्या मैत्रिणींचे लेटरही वाचण्यात आले. निकोलची बेस्ट फ्रेन्ड एशलेने लिहिले की, निकोलची जेनसोबत भेट व्हायलाच नको होती.