'लवकर मरायचंय, आयुष्याला कंटाळलेय!' वहिनीनं ठेवलं व्हॉट्स ऍप स्टेटस; दिरानं चाकूनं भोसकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 10:03 AM2022-04-20T10:03:17+5:302022-04-20T10:03:32+5:30

दिराचे वहिनीवर चाकूने वार; दोन वर्षांच्या पुतण्यासमोरच घडला प्रकार

Man Stabs Sister In Law To Death After Nephew Disrupts His Studies In Bhopal | 'लवकर मरायचंय, आयुष्याला कंटाळलेय!' वहिनीनं ठेवलं व्हॉट्स ऍप स्टेटस; दिरानं चाकूनं भोसकलं

'लवकर मरायचंय, आयुष्याला कंटाळलेय!' वहिनीनं ठेवलं व्हॉट्स ऍप स्टेटस; दिरानं चाकूनं भोसकलं

Next

भोपाळ: मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेची तिच्याच दिरानं हत्या केली आहे. दिर मनोज अहिरवार नीटची तयारी करत होता. मनोज अभ्यास करताना वहिनीचा लहान मुलगा रडायचा. त्यामुळे वहिनी कविता अहिरवार मुलाला ओरडायची. त्यामुळे मनोजच्या अभ्यासात व्यत्यय यायचा. याच कारणावरून सोमवारी दिर आणि वहिनीमध्ये भांडण झालं. वाद टोकाला गेल्यानंतर मनोजनं चाकू भोसकून कविताला संपवलं. गळ्याला चाकू लागून जास्त रक्तस्राव झाल्यानं कविताचा मृत्यू झाला.

गांधीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज बारावीनंतर नीटची तयारी करत होता. तो अभ्यास करताना कविता तिच्या मुलाला ओरडायची. सोमवारी मनोज आणि कविता घरात होते. मनोजचे वडील, लहान आणि मोठे भाऊ बाहेर गेले होते. त्यावेळी मनोजचा दोन वर्षांचा पुतण्या कुणालदेखील घरातच होता. 

मनोज अभ्यास करत असताना कुणाल रडू लागला. त्यामुळे मनोजच्या अभ्यासात व्यत्यय आला. यावरून मनोज आणि कविता यांच्यामध्ये वाद झाला. भांडण मारहाणीपर्यंत पोहोचलं. पुतण्याच्या रडण्यामुळे अभ्यास होत नसल्याचं मनोज म्हणत होता. वाद विकोपाला गेल्यावर मनोजनं स्वयंपाकघरातील सुरीनं कवितावर हल्ला केला.

मनोजनं सुरीच्या मदतीनं कविताच्या पोटावर, मानेवर आणि हातावर वार केले. मानेवर झालेल्या जखमेतून अधिक रक्तस्राव झाल्यानं कविता बेशुद्ध पडली. त्यानंतर मनोज सुरी घेऊन घरातून फरार झाला. त्यानंतर चिमुरड्या कुणालनं शेजाऱ्यांना बोलावलं. तोपर्यंत कविताचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मनोजला अटक झाली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

चार दिवसांपूर्वी कवितानं ठेवलं होतं व्हॉट्स ऍप स्टेटस
१८ एप्रिलला मनोजनं कविताची चाकू भोसकून हत्या केली. त्याआधी चार दिवसांपूर्वी, म्हणजेच १४ एप्रिलला कवितानं व्हॉट्स ऍपवर एक स्टेटस ठेवलं होतं. 'मला लवकर मरायचंय, आयुष्याला त्रासलीय,' असं कवितानं स्टेटसमध्ये म्हटलं होतं. कविता तिच्या दिराच्या आणि सासूच्या त्रासाला कंटाळली होती, असा दावा तिच्या भावानं केला आहे.

Web Title: Man Stabs Sister In Law To Death After Nephew Disrupts His Studies In Bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.