4 मुलांच्या बापाने तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवलं हाय प्रोफाईल कॉल गर्ल आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 12:53 PM2022-06-07T12:53:57+5:302022-06-07T12:54:41+5:30

Gaya Crime News : आरोपीने तिच्यासोबत संबंध असताना तिचा एक  अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि मग तिला तो ब्लॅकमेल करू लागला होता. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने प्रेयसीला कॉल गर्ल बनवण्याचा निर्णय केला.

Man trapped a girl in love affairs and made her call girl in Gaya Bihar | 4 मुलांच्या बापाने तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवलं हाय प्रोफाईल कॉल गर्ल आणि मग....

4 मुलांच्या बापाने तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवलं हाय प्रोफाईल कॉल गर्ल आणि मग....

googlenewsNext

बिहारच्या (Bihar) गयामध्ये (Gaya Crime News) एका व्यक्तीने प्रेमाच्या नावावर असं काही घाणेरडं कृत्य केलं, ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. चार मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीने एका तरूणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि नंतर तिचा वापर करून तिला कॉल गर्ल बनवलं.

आरोपीने तिच्यासोबत संबंध असताना तिचा एक अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि मग तिला तो ब्लॅकमेल करू लागला होता. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने प्रेयसीला कॉल गर्ल बनवण्याचा निर्णय केला. त्यानंतर त्याने धमक्या देत तिला देहविक्रीच्या व्यवसायात उतरवलं. पैसे घेऊन तो तिला पटणा, रांची आणि मुंबईला पाठवू लागला होता.
हे प्रकरण गयातील इमामगंज भागातील एका तरूणीचं आहे. तरूणी मोहम्मद अयूब खान नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली होती. पण त्याचं तिच्यावर प्रेम नव्हतं. त्याचा प्लान काहीतरी वेगळाच होता. हळूहळू तो तिला त्याच्या मित्रांकडे भिती दाखवून पाठवू लागला. त्या बदल्यात त्याला मोठी रक्क मिळत होती.

पीडित तरूणीने सांगितलं की, प्रेमात दगा मिळाल्यानंतर आणि देहविक्रीच्या क्षेत्रात आल्यानंतर यातून बाहेर पडण्याचा  निर्णय घेतला. त्यानंतर तिने एका दुसऱ्या तरूणासोबत लग्न केलं आणि सगळं काही ठीक सुरु होतं. पण तिचा आधीचा प्रियकर काही शांत बसला नाही. तो तिला पुन्हा देहविक्री करण्यासाठी धमक्या देऊ लागला होता आणि पतीला व्हिडीओ पाठवण्याच्या नावावर तिला ब्लॅकमेल करू लागला होता. तरूणीने जेव्हा नकार दिला तेव्हा त्याने तिच्या पतीला तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवले.

त्यानंतर आधीच्या प्रियकराकडून पिच्छा सोडवण्यासाठी तरूणीने इमामगंज महिला पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार दाखल केली. या दरम्यानही आरोपी गप्प बसला नाही. तो तरूणी आणि तिच्या पतीला सतत त्रास देत राहिला. त्याची इच्छा होती की, तिचं लग्न मोडावं.

त्यानंतर तरूणीने त्याला धडा शिकवण्याचा निश्चय केला. प्लानिंग करून तिने त्याला फोन करून गयाला येण्यास  सांगितलं. पण त्याने तिला गयाऐवजी बोधगयातील एका हॉटेलमध्ये बोलवलं. तरूणीने ते मान्य केलं आणि हॉटेलमध्ये जाण्याआधी काही लोकांना तिने याची माहिती दिली.

पीडित तरूणी  बोधगयामधील हॉटेलमध्ये पोहोचली आणि बंद खोली आरोपीची चांगली धुलाई केली. तरूणीकडून  काही लोक आधीच हॉटेलमध्ये उपस्थित होते आणि त्यांनीच आरोपीला बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपीला पीडित महिलेने पोलिसांकडे  सोपवलं.

Web Title: Man trapped a girl in love affairs and made her call girl in Gaya Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.