स्टॉक ट्रेडिंग अॅपद्वारे आरोपीने महिला डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 11:40 AM2022-03-04T11:40:47+5:302022-03-04T11:47:36+5:30
Crime News : आरोपी केशवपुरम पोलीस स्टेशनच्या कन्हैया नगर भागात राहत होता आणि त्याने बॅचलर असल्याचे भासवून महिला डॉक्टरची चॅटिंग अॅपवर फसवणूक केली.
नवी दिल्ली : ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून मैत्री करून महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण दिल्लीतील केशवपुरम भागातील असून पीडित महिला व्यवसायाने डॉक्टर आहे.
30 वर्षीय महिला डॉक्टरने यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, बंबल अॅपच्या माध्यमातून आरोपीने या महिलेसोबत मैत्री केली. त्यानंतर अविवाहित असल्याचे भासवून लग्नाची ऑफर दिली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडित महिला त्याने दिलेल्या पत्त्यावर त्याला भेटायला पोहोचली.
याचबरोबर, महिला डॉक्टरने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, भेटीस गेल्यानंतर आरोपीने तिला ओलीस ठेवले आणि दिल्लीतील केशवपुरममध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडितेने जीव वाचवून तेथून पळ काढला आणि पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बंबल अॅपवर चॅटिंगद्वारे, आरोपी व्यक्तीने बॅचलर असल्याचे भासवून लग्नाची ऑफर दिली होती. त्यानंतर महिला आरोपीने भेटण्यासाठी सांगितलेल्या ठिकाणी गेली.
महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, भेटीनंतर आरोपीने तिला एका खोलीत कोंडून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी केली, ज्यामध्ये बलात्कारासोबतच बळजबरी आणि मारहाण केल्याची स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, आरोपी केशवपुरम पोलीस स्टेशनच्या कन्हैया नगर भागात राहत होता आणि त्याने बॅचलर असल्याचे भासवून महिला डॉक्टरची चॅटिंग अॅपवर फसवणूक केली.