दोघांचं सुरू होतं भांडण, सोडवण्यासाठी आलेल्या तिसऱ्याची एकाने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 01:57 PM2021-08-12T13:57:32+5:302021-08-12T13:59:36+5:30

पोलिसांनुसार, ही घटना बुधवारची आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची हत्या भांडत असलेल्या दोघांपैकी एका व्यक्तीने केली.

Man tried to pacify fighting two persons was killed by one of them in umred in Nagpur | दोघांचं सुरू होतं भांडण, सोडवण्यासाठी आलेल्या तिसऱ्याची एकाने केली हत्या

दोघांचं सुरू होतं भांडण, सोडवण्यासाठी आलेल्या तिसऱ्याची एकाने केली हत्या

Next

नागपूर शहरात दिवसेंदिवस गुन्हे वाढताना दिसत आहे. सतत गॅंगवॉरमुळे चर्चेत राहणाऱ्या नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनुसार, ही घटना बुधवारची आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची हत्या भांडत असलेल्या दोघांपैकी एका व्यक्तीने केली.

मीडिया रिपोर्टनुसार, मृतकाचं नाव प्रवीण कथाने आहे. तो परसोडीचा राहणारा होता. तर आरोपी सुरेशही स्थानिक नागरिक आहे. पोलिसांनुसार, आशीष बांधकाम मजूर आहे. तो साहिल धमकेकडे केलेल्या कामाची मजुरी मागत होता. त्यानंतर दोघांमध्ये वाद पेटला. (हे पण वाचा : एक हत्या, दोन आरोपी, 170 सीसीटीव्ही, 230 जणांची चौकशी अन् 600 किमी अंतरावर पुरावा; असा झाला उलगडा)

मजुरीवरून आशीष आणि साहिलमध्ये भांडण झालं होतं. प्रवीण दोघांचं भांडण सोडवण्यासाठी मधे गेला होता. प्रवीण मधे आल्याने आशीष नाराज झाला आणि त्याने त्याच्यावर वीटेने हल्ला केला. यात प्रवीणचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

आणखी एक हत्या....

नागपूरमध्ये हत्येची आणखी एक घटना समोर आली आहे. इथे उधारी मागितल्यावर आरोपीने आपल्या साथीदारासोबत मिळून एका व्यक्तीची हत्या केली आहे. इथे अनवर शेखने शहजादकडून ३ हजार रूपये उधार घेतले होते. अनवर चिकन शॉप चालवतो. तर शहजाद मजुरी करतो. अनवर शहजादचे पैसे परत देत नव्हता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यादरम्यान शहजादने अनवरला शिव्या दिल्या. यानंतर अनवरने राजेशसोबत मिळून शहजादची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
 

Web Title: Man tried to pacify fighting two persons was killed by one of them in umred in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.