उच्चभ्रू घरातील महिलांना धमकावून "तो" मागायचा खंडणी

By मनीषा म्हात्रे | Published: September 18, 2022 10:41 PM2022-09-18T22:41:51+5:302022-09-18T22:42:04+5:30

सुतारकाम करण्याच्या बहाण्याने कॉल...आणि खंडणीसाठी तगादा

man used to demand ransom by threatening the women of elite houses | उच्चभ्रू घरातील महिलांना धमकावून "तो" मागायचा खंडणी

उच्चभ्रू घरातील महिलांना धमकावून "तो" मागायचा खंडणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उच्चभ्रू वस्तीतील घरांमध्ये कॉल करून तेथील महिलांना धमकावून खंडणीची मागणी करणाऱ्या ४९ वर्षीय आरोपीला गावदेवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इम्तियाज अब्दुल खुर्दुस अन्सारी(४९)  असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडे अधिक तपास सुरु आहे.

               पेडर रोड येथील एका व्यावसायिक महिलेच्या घरी लँडलाईनवर कॉल करून धमकावत होता. याप्रकरणी महिला व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी खंडणी, विनयभंग व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.  कुर्ला कमानी येथील रहिवासी असलेल्या अन्सारी विरोधात धमकावणे, खंडणी, विनयभंग अशा १९ गुन्ह्यांची नोंद आहे. याप्रकरणातील ३२ वर्षीय तक्रारदार महिला घाटकोपर येथील रहिवासी असून व्यवस्थापक म्हणून काम करतात. आरोपीने २४ ऑगस्टपासून १४ सप्टेंबरपर्यंत तक्रारदार यांच्या मोबाइलवर तसेच त्यांच्या मालकिणीच्या राहत्या घरातील लँडलाईनवर सतत फोन करून अश्लील शिवीगाळ केली. तसेच तक्रारदार यांना बलात्कार व हत्या करण्याची धमकी देऊन १० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने साकिनाका काजूपाडा परिसरातून आरोपीला अटक केली.

असे हेरायचा महिलांना ...
चौकशी दरम्यान, अन्सारी पेडर रोड, बिडी रोड, नेपियन सी रोड, मलबार हिल, जुहू, गावदेवी, बांद्रा परिसरात विविध उच्चभ्रू लोकांच्या घरात लँडलाइनवर दूरध्वनी करून सुतारकाम करायचे असल्याचे सांगून माहिती घेत असे. त्यानंतर तेथे महिला आढळल्यास वारंवार दूरध्वनी करून अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागत असल्याचे समोर आले. त्याचा मोबाईल ताब्यात घेत पोलीस अधिक  तपास करत आहे. तो असे का करत होता? त्याने आतापर्यंत किती महिलांना कॉल करून त्रास दिला? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.

Web Title: man used to demand ransom by threatening the women of elite houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.