प्रेग्नंट पत्नीला घटस्फोट देण्यासाठी पतीचं धक्कादायक कृत्य, फसवून एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन टोचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 10:36 AM2022-12-19T10:36:16+5:302022-12-19T10:36:42+5:30

Crime News : पती उपचाराचा बहाना करून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि कथितपणे तिला एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन दिलं. ही घटना ताडेपल्लीतील आहे.

Man wanting an excuse to divorce his pregnant wife allegedly got hiv infected blood injected | प्रेग्नंट पत्नीला घटस्फोट देण्यासाठी पतीचं धक्कादायक कृत्य, फसवून एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन टोचलं

प्रेग्नंट पत्नीला घटस्फोट देण्यासाठी पतीचं धक्कादायक कृत्य, फसवून एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन टोचलं

Next

Crime News : आंध्र प्रदेशमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने पत्नीला घटस्फोट देण्यासाठी एक खतरनाक षडयंत्र रचलं.  आरोपी पतीला काहीही करून पत्नीला घटस्फोट द्यायचा होता आणि ती गर्भवती होती. आरोप आहे की, पती उपचाराचा बहाना करून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि कथितपणे तिला एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन दिलं. ही घटना ताडेपल्लीतील आहे.

आरोपी पतीने हा सगळा प्लान एका बोगस डॉक्टरच्या मदतीने केला. पती आणि डॉक्टरने महिलेला प्रेग्नन्सीमध्ये चांगल्या आरोग्यासाठी इंजेक्शन देत असल्याचं खोटं सांगितलं. जेव्हा महिलेला हे समजलं तेव्हा तिला धक्का बसला. पीडित महिलेने आता पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

ताडेपल्ली पोलिसांनी सांगितलं की, महिलेच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला लगेच अटक केली. आरोपी एम. चरण याने एका बोगस डॉक्टरच्या मदतीने महिलेला एक एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन दिलं होतं. असं समजलं की, उपचाराचा बहाना करून तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. 

पीडितेने सांगितलं की, नंतर ती एका हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेली होती. तिथे टेस्टमधून समजलं की, ती एचआयव्ही पॉझिटिव्ह झाली आहे. आरोपी पती तिला घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे. 

न्यूज एजन्सीनुसार, पीडित महिलेचा आरोप आहे की, तिचा पती तिला हुंड्यासाठी त्रास देत होता. तिला एक मुलगी आहे. त्याला आता मुलगा हवा आहे. मुलासाठी त्यांचा खूप दबाव होता. आता पोलीस पुढील कारवाई करत आहे.
 

Web Title: Man wanting an excuse to divorce his pregnant wife allegedly got hiv infected blood injected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.