मासे पकडण्यासाठी गेलेला इसम वाहून गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 22:32 IST2022-07-04T22:32:38+5:302022-07-04T22:32:51+5:30
आरमोरी (गडचिरोली) : नाल्याच्या वाहत्या पाण्यात मासे पकडण्यासाठी आपल्या सहकाऱ्यासोबत गेलेला एक इसम वाहून गेल्याची घटना वसा येथील कोलांडी ...

मासे पकडण्यासाठी गेलेला इसम वाहून गेला
आरमोरी (गडचिरोली) : नाल्याच्या वाहत्या पाण्यात मासे पकडण्यासाठी आपल्या सहकाऱ्यासोबत गेलेला एक इसम वाहून गेल्याची घटना वसा येथील कोलांडी नाल्याजवळ घडली. नाल्यात वाहून गेलेल्या इसमाने नाव राजकुमार एकनाथ राऊत (३८ वर्ष) असे असून तो देलोडा बुज. येथील रहिवासी आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने नाले ओसंडून वाहात आहेत. सोमवारी दिवसभर पाऊस सुरू होता. त्यामुळे नाल्यावर मासे पकडण्यासाठी राजकुमार राऊत हा शंकर लोमेश राऊत, विलास एकनाथ राऊत, ऋषी नामदेव कलसार व प्रकाश हिरामण मडावी सर्व राहणार देलोडा ( बुज) यांच्यासोबत वसा येथील नाल्यावर गेला होता. नाल्यात उतरल्यानंतर खोल पाण्याचा अंदाज न आल्याने राजकुमार हा नाल्यात वाहून गेला.
यावेळी ऋषी कलसार, प्रकाश मडावी व अजून एकजण हेही पाण्यात बुडाले होते, मात्र त्यांना मच्छिमारांच्या सहाय्याने वाचवण्यात यश आले.