3 बायका असतानाही पडला चौथीच्या प्रेमात! लग्न नको म्हणून प्लॅनिंगनं काढला काटा, सॅंडलनं पकडला गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 09:57 AM2022-12-22T09:57:53+5:302022-12-22T10:00:16+5:30
Crime News : पोलिसांनी महिलेच्या जिम ट्रेनर बॉयफ्रेंडला सुद्धा अटक केली आहे. पोलिसांनुसार, या व्यक्तीला आधीच तीन पत्नी आहेत.
Crime News : नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने प्रेयसीची हत्या केली. हत्या केल्यावर महिलेचा मृतदेह गढी नदीत फेकला. पण क्राइम ब्रांच यूनिट-2 च्या टीमने महिलेच्या ब्रांडेड सॅंडलच्या मदतीने केस सॉल्व केली. पोलिसांनी महिलेच्या जिम ट्रेनर बॉयफ्रेंडला सुद्धा अटक केली आहे. पोलिसांनुसार, या व्यक्तीला आधीच तीन पत्नी आहेत. या हत्येत त्याच्या मित्राने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याची माहिती समोर येत आहे.
TOI नुसार हत्येचा गुन्हा 14 डिसेंबरला पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सांगितलं की, महिलेची ओळख कौपरखैरनेची 27 वर्षीय उर्वशी वैष्णव अशी पटली आहे. उर्वशीचा आधी गळा आवळण्यात आला आणि नंतर तिचा मृतदेह नदीत फेकण्यात आला. पोलिसांनी पुढे सांगितलं की, सीसीटीव्ही फुटेजच्या अभावामुळे क्राइम ब्रांच टीम तिच्या सॅंडलच्या मदतीने आरोपीपर्यंत पोहोचली.
क्राइम ब्रांच यूनिट-2 चे सीनियर इंस्पेक्टर रवींद्र पाटील म्हणाले की, आम्ही मुख्य आरोपी 36 वर्षीय रियाज खान आणि त्याचा साथीदार 26 वर्षीय इमरान शेखला अटक केली आहे. रियाज देवनारच्या एका जिममध्ये ट्रेनर आहे आणि इमरान कुरिअर डिलेव्हरीचं काम करतो. पाटील यांनी पुढे सांगितलं की, मृतदेहाजवळ एक ब्रांडेड सॅंडल आढळून आली होती. याच्या मदतीने आरोपीचा शोध लावण्यात आला.
पाटील पुढे म्हणाले की, आम्ही नवी मुंबईतील सगळ्याच फुटवेअरच्या दुकानांमध्ये विचारपूस केली आणि गेल्या एक आठवड्याचे सीसीटीव्ही फुटेजही चेक केले. शेवटी आम्हाला वाशी भागातील एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आम्हाला हे लोक दिसले. तो एका बॉडीबिल्डरसारखा दिसतो. त्यामुळे आम्ही वाशी आणि कोपरखैरणेच्या सगळ्या जिमची पाहणी केली. शेवटी रियाज खानची ओळख पटली. तो कोपरखैरणेच्या एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करतो.
पोलिसांनी सांगितलं की, नंतर आम्ही गोवंडीहून इमरान खान यालाही ताब्यात घेतलं. त्याने कबूल केलं की, त्याने रियाजला महिलेचा मृतदेह गढी नदीत फेकण्यासाठी मदत केली होती. इमरानने चौकशी दरम्यान सांगितलं की, रियाजने उर्वशीचा गळा दाबला. पोलीस म्हणाले की, 17 डिसेंबरला आम्ही रियाजसाठी एक सापडा रचला आणि त्याला देवनारमधून अटक केली. त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. उर्वशी रियाजवर लग्नसाठी दबाव टाकत होती. पण रियाज यासाठी तयार नव्हता. कारण तो आधीच विवाहित होता आणि त्याला तीन बायका होत्या.