पॉर्न साइट्सवर विकायचा प्रेयसीचे अश्लील फोटो; एका मोठ्या कंपनीच्या मॅनेजरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 11:30 AM2020-06-09T11:30:05+5:302020-06-09T11:50:06+5:30
आरोपी आणि पीडित महिला दोघेही गेल्या काही वर्षांपूर्वी ट्रेनमध्ये भेटले होते. दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला, मग येथून हे प्रेमाचे नाते सुरू झाले. दोघेही जवळपास 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.
नोएडा : एका नामांकित कंपनीत दरमहा एक लाख रुपये पगार असलेल्या मॅनेजरने ब्रेकअपनंतर आपल्या प्रेयसीचा बदला घेण्यासाठी तिचे अश्लील फोटो पॉर्न साइट्सवर विकल्याचे समोर आले आहे. या मॅनेजरने प्रेयसीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ पॉर्न साइट्सवर 10-20 रुपयांच्या विकले आहेत. दरम्यान, याप्रकरणी प्रेयसीने पोलिसांत तक्रार दिली. यानंतर प्रेयसी महिलेचा मानसिक छळ पाहून पोलिसांचे एक पथक लॉकडाऊनदरम्यान पश्चिम बंगाल येथे रवाना झाले. त्यानंतर कोलकाता येथून पोलिसांनी आरोपीला अटक करुन नोएडा येथे आणले.
डीसीपी महिला सुरक्षा वृंदा शुक्ला यांनी सेक्टर -108 पोलीस आयुक्त कार्यालयात सांगितले की, महिलेने 3 मे रोजी फेज-3 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी या महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ दररोज सोशल साइट्सवर अपलोड केले जात होते. यासह काही प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ, फोटो विकून ई-वॉलेटमधून पैसेही घेतले जात होते. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यात दोन-तीन तरुणांची नावे समोर आली. यापैकी एका तरुणाचे या संबंधित महिलेशी 4-6 वर्षांपूर्वी संबंध होते.
पोलिसांना संपूर्ण प्रकरण समजले. आरोपी पश्चिम बंगालमधील बारुईपूर येथे होता. यानंतर फेज -3 पोलीस ठाण्याचे पथक पश्चिम बंगालमध्ये गेले. या पथकाने आरोपीला कोलकाताहून आणले आहे. आरोपी हा नॅशनल कंपनीत एरिया मॅनेजर आहे. याआधी आरोपी लखनऊ व इतर शहरांमध्ये राहत होता. या गुन्ह्यात आरोपीच्या काही साथीदारांचा देखील सहभाग असल्याचे संशय असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला दोघेही गेल्या काही वर्षांपूर्वी ट्रेनमध्ये भेटले होते. दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला, मग येथून हे प्रेमाचे नाते सुरू झाले. दोघेही जवळपास 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. या काळात आरोपीने बहाण्याने महिलेला काही अश्लील फोटो, व्हिडिओ मागितले, असा आरोप केला जात आहे. त्यावेळी काही व्हिडिओ आणि फोटो तयार केले.
याशिवाय, असेही उघडकीस आले की आरोपी आणि त्याचे मित्र एका सोशल साइटवर ग्रुप चॅट करायचे, ज्यामध्ये आरोपीनेही अनेक वेळा या महिलेला या चॅटमध्ये सामील केले होते. यानंतर, दोघांमध्ये काही गोष्टीवरुन भांडण झाले आणि दोघांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर महिलेने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले. दरम्यान, आरोपीची पोस्टिंग कोलकाता येथे झाल्यामुळे त्याला पकडण्यास उशीर झाला. आरोपीने त्या महिलेसोबत सूड उगवण्याच्या उद्देशाने तिचे अश्लिल फोटो विकण्याचे काम सुरू केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
आणखी बातम्या...
CoronaVirus News : 'हा' देश झाला कोरोनामुक्त, पंतप्रधानांनी केला डान्स!
सिंथिया डी रिची आणि वादाचं जुनं नातं; बेनझीर भुट्टो यांच्यावरही आक्षेपार्ह भाष्य केलं होतं
ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांनी कोरोना नियम मोडले, तर बॉसला होणार तुरुंगवास!
अमेरिकेत सर्वात मोठी आर्थिक मंदी येणार, अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती