हॉटेलमध्ये 'बॉयफ्रेन्ड'सोबत होती महिला, पतीने गोळी झाडून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 03:21 PM2022-06-24T15:21:40+5:302022-06-24T15:22:12+5:30

पोलिसांनी सांगितलं की, पती दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलवर पोहोचला आणि आपल्या पत्नीला सनीसोबत बघून संतापला. त्याने जागीच सनीवर गोळी झाडून त्याची हत्या केली.

Manali man shoots himself after killing wife male friend in Manali hotel | हॉटेलमध्ये 'बॉयफ्रेन्ड'सोबत होती महिला, पतीने गोळी झाडून केली आत्महत्या

हॉटेलमध्ये 'बॉयफ्रेन्ड'सोबत होती महिला, पतीने गोळी झाडून केली आत्महत्या

Next

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या पुरूष मित्राची हत्या केल्यावर कथितपणे स्वत:वर गोळी झाडली. पोलिसांनुसार, दिल्लीच्या दोन महिला, ज्यातील एक विवाहित आहे. त्या मनालीतील एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. त्यांनी गुरूवारी रात्री त्यांचा मित्र सनीला रूमवर बोलवलं होतं.

पोलिसांनी सांगितलं की, पती दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलवर पोहोचला आणि आपल्या पत्नीला सनीसोबत बघून संतापला. त्याने जागीच सनीवर गोळी झाडून त्याची हत्या केली. एसपीने सांगितलं की, महिलेनुसार तिच्या पतीने सनीची हत्या केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. 
एक फॉरेन्सिक टीम घटनास्थळी बोलवली आहे आणि ते तपास करत आहेत. ते म्हणाले की, प्राथमिकहृष्ट्या असं वाटतं की, या हत्येत महिलांची काहीच भूमिका नाही. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेने मनालीमध्ये हॉटेल भाड्याने घेतलं होतं. तर पती जीभीमध्ये हॉटेल चालवत होता. तर सनी हा हरयाणाचा राहणारा आहे.

हॉटेलच्या कर्मचाऱ्यानुसार, सकाळी हॉटेलमधून फायरिंगचा आवाज आला तर तो धावत गेला. घटनास्थळी दोघांना गोळी लागली होती आणि दोघेही जमिनीवर पडले होते. मी लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. सध्या तरी पोलिसांनी महिला निर्दोष असल्याचं म्हटलं आहे.

Web Title: Manali man shoots himself after killing wife male friend in Manali hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.