तलाठ्याचा मंडल अधिकारी झाला, ACB च्या जाळ्यात अडकला; असा लावला सापळा
By वैभव गायकर | Published: January 13, 2023 06:20 PM2023-01-13T18:20:19+5:302023-01-13T18:21:22+5:30
पनवेल तालुक्यतील सजा सुकापूरचे तलाठी आहेत. सध्या त्यांची नेमणूक अलिबाग तहसील कार्यालय मंडळ अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
पनवेल :पनवेल तहसील कार्यालयतील मंडळ अधिकारी संजय विष्णू पाटील यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) निवी मुबई युनिटने लाच घेताना दि.13 रोजी अटक केली. संजय विष्णू पाटील (55) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
पनवेल तालुक्यतील सजा सुकापूरचे तलाठी आहेत. सध्या त्यांची नेमणूक अलिबाग तहसील कार्यालय मंडळ अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. यातील तक्रारदार यांचे राहते मातोश्री को-ऑपरेटिव्ह सोसायटी चे नाव सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी संजय पाटील यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोड करून 10 हजार रुपये लाच देण्याचे मान्य झाले. या प्रकरणात लाच लुचपत विभागाने पाटील यांना दहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण, पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे, पोलीस हवालदार जाधव, पोलीस हवालदार पवार, महिला पोलीस नाईक बासरे, पोलीस शिपाई चव्हाण, पोलीस शिपाई माने, पोलीस शिपाई चौलकर यांनी सापळा रचून संजय विष्णू पाटील यांना अटक केली.