काळ्या जादूसाठी मांडुळाची 70 लाखांना विक्री, कल्याणमधून 5 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 08:51 AM2022-08-23T08:51:10+5:302022-08-23T08:51:43+5:30
ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये अज्ञातांकडून मांडळुाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती
कल्याण - मांडुळ या प्राण्याबद्दल अनेक समज, गैरसमज आहेत. काळी जादू करण्यासाठी या नागाचा वापर केला जातो. त्यातून पैशाचा पाऊस पाडणे किंवा मनातील इच्छापूर्तीसाठी या नागाचा विक्री केली जाते. त्यामुळेच, मांडुळ गुन्हेगारी जगतात लाखो रुपयांना या नागाची तस्करीही करण्यात येते. नुकतेच कल्याणमध्ये मांडुळाची तस्करी करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये अज्ञातांकडून मांडळुाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यांच्याकडून मांडुळही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra | Five persons arrested for smuggling sand boa snakes, a snake worth Rs 70 lakhs recovered in Kalyan city of Thane dist
— ANI (@ANI) August 23, 2022
Based on a tip-off, the police laid a trap and arrested the accused. Further probe underway: ACP Umesh Mane Patil (22.08) pic.twitter.com/hgjuKiUEHS