बोंबला! पोलिसांपासून वाचण्यासाठी चोराने आयस्क्रीमसोबत खाल्ले सोन्याचे दागिने, असा झाला खुलासा....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 05:01 PM2021-05-31T17:01:52+5:302021-05-31T17:03:23+5:30

चोराने पोलिसांपासून वाचवण्यासाठी सोन्याचे दागिने आयस्क्रीमसोबत गिळंकृत केले होते. पण तो जास्त वेळ रे लपवून ठेवू शकला नाही. 

Mangaluru thief swallowed 35 gm of gold ornaments jewelery with Icecream arrested | बोंबला! पोलिसांपासून वाचण्यासाठी चोराने आयस्क्रीमसोबत खाल्ले सोन्याचे दागिने, असा झाला खुलासा....

बोंबला! पोलिसांपासून वाचण्यासाठी चोराने आयस्क्रीमसोबत खाल्ले सोन्याचे दागिने, असा झाला खुलासा....

Next

(प्रातिनिधीक छायाचित्र)

कर्नाटकातील मंगळुरूमधून चोरीची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका चोराच्या पोटातून ३५ ग्रॅम सोनं काढण्यात आलं आहे. चोराने पोलिसांपासून वाचवण्यासाठी सोन्याचे दागिने आयस्क्रीमसोबत गिळंकृत केले होते. पण तो जास्त वेळ रे लपवून ठेवू शकला नाही. 

पोलीस सूत्रांनुसार, शनिवारी सकाळी चोराच्या पोटात जोरात दुखू लागलं होतं. ज्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पोटात का दुखतंय याचं कारण जाणून घेण्यासाठी तिथे त्याचा एक्स-रे काढण्यात आला आणि रिपोर्टमधून समोर आलं की, चोराच्या आतड्यांमध्ये दागिने आहेत. (हे पण वाचा : भयंकर! अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या; गावकऱ्यांनी मृतदेहासोबत लावलं प्रेयसीचं लग्न, केली मारहाण)

रविवारी डॉक्टरांनी चोराचं ऑपरेशन केलं आणि ज्यानंतर त्याच्या पोटातून अंगठी आणि कानातले दागिने काढण्यात आले. चोराच्या पोटातून काढण्यात आलेल्या दागिन्यांचं वजन ३५ ग्रॅम इतकं आहे. या दागिन्यांची बाजारातील किंमत १ लाख ७० हजार ८०० रूपये इतकी आहे.

दागिन्यांची चोरी करणाऱ्या चोराचं नाव शीबू आहे. चौकशी दरम्यान त्याने पोलिसांना सांगितलं होतं की, सोनं लपवण्यासाठी त्याने ते दागिने आयस्क्रीमसोबत गिळंकृत केले होते. (हे पण वाचा : पत्नीसोबत भांडला, रेल्वे रुळांवर जाऊन झोपला; तितक्यात ट्रेन आली अन्...)

हॉस्पिटलमधून ऑपरेशननंतर चोराला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आङे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आाला असून पुढील कारवाई केली जात आहे. 
 

Web Title: Mangaluru thief swallowed 35 gm of gold ornaments jewelery with Icecream arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.