मंगेश कडव याने ‘सीए’ला व्याजावर कर्ज देऊन फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 01:30 AM2020-07-16T01:30:48+5:302020-07-16T01:32:13+5:30

शिवसेनेचे निलंबित शहर प्रमुख मंगेश कडव याने एका सीए ला कर्ज देऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीए अश्विन माणकेश्वर यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी कडव विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Mangesh Kadav cheated CA by giving loan at interest | मंगेश कडव याने ‘सीए’ला व्याजावर कर्ज देऊन फसवले

मंगेश कडव याने ‘सीए’ला व्याजावर कर्ज देऊन फसवले

Next
ठळक मुद्देआणखी एक गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेनेचे निलंबित शहर प्रमुख मंगेश कडव याने एका सीए ला कर्ज देऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीए अश्विन माणकेश्वर यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी कडव विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
माणकेश्वर यांची सीए कंपनी आहे. कडव याच्याशी त्यांची ओळख आहे. २०१४ च्या सुरुवातीला आर्थिक संकटात असल्याने माणकेश्वर यांनी ५ टक्के मासिक व्याजावर कडव याच्याकडून १० लाख रुपये कर्ज घेतले होते. जामीन म्हणून त्याने माणकेश्वर यांची बीएमडब्ल्यू कार गहाण ठेवून घेतली होती. कडवने पहिल्या हप्त्याचे ५० हजार रुपये व्याज कापून माणकेश्वर यांना ९.५० लाख रुपये दिले होते. दोन चार महिन्यानंतर व्याजाचे हप्ते फेडू न शकल्याने कडव संतापला. ऑक्टोबर महिन्यात कडव आपल्या १०-१५ साथीदारांसह माणकेश्वर यांच्याकडे गेला. त्याने माणकेश्वर यांची विटारा कार हिसकावून घेतली. माणकेश्वर यांचे म्हणणे आहे की, कडवने त्यांची कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतली. त्यावेळी सुद्धा कडवने २ लाख रुपये घेतले.
२०१६ मध्ये कडवने माणकेश्वर यांच्या विटारा कारवर १३.८१ लाखाचे कर्ज घेतले. काही दिवसानंतर ती कार माणकेश्वर यांना परत केली. त्यांना कारवर १२ लाख रुपये कर्ज असल्याने ते अदा करण्यास सांगण्यात आले. माणकेश्वरने १५.२३ लाख रुपयाचे हप्ते फेडले. एक आठवड्यापासून कडव प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेला माणकेश्वर यांच्याशी कडवची ओळख असल्याचे समजले. त्यांना विचारपूस करण्यासाठी बोलावण्यात आले. तेव्हा माणकेश्वर यांनी या घटनेची माहिती दिली. या आधारावर बजाजनगर पोलीस ठाण्यात अवैध सावकारी, दरोडा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत आणखी एका सीएचे नावही पुढे आले आहे. त्यांचीही विचारपूस करण्यात येणार आहे.

Web Title: Mangesh Kadav cheated CA by giving loan at interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.