मनीष गुप्ताच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना शहरात एका व्यक्तीचा गुंडाच्या मारहाणीत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 09:51 AM2021-10-01T09:51:23+5:302021-10-01T09:51:56+5:30

UP Crime: प्रॉपर्टी डीलर मनीष गुप्ताच्या मृत्यूच्या अवघ्या 72 तासातच शहरात एका कॅन्टीन कर्मचाऱ्याचा गुंडांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे.

Manish Gupta's murder case is fresh while a man was beaten to death by a goon in the gorakhpur city | मनीष गुप्ताच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना शहरात एका व्यक्तीचा गुंडाच्या मारहाणीत मृत्यू

मनीष गुप्ताच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना शहरात एका व्यक्तीचा गुंडाच्या मारहाणीत मृत्यू

Next

गोरखपूर:उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात पोलिसांच्या मारहाणीत ठार झालेल्या प्रॉपर्टी डीलर मनीष गुप्ताच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाचा शहरातील मॉडेल शॉपमध्ये वाईन शॉपच्या कर्मचाऱ्याचा गुंडांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी उशिरा ऑर्डर घेण्यास उशीर झाल्यामुळे गुंडांनी कर्मचाऱ्याला हॉकी स्टिकने मारहाण केली, यानंतर उपचारादरम्यान त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. 

या घटनेत दुसऱ्या एक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी सकाळी गोरखपूर पोलिसांनी ट्विट करुन रामगढताल पोलीस स्टेशनमध्ये मॉडेल शॉप घटनेसंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. तसेच, घटनेतील एका आरोपीला ताब्यात घेतलं असून, उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करुन रासुका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले.

काय आहे घटना ?
गोरखपूर येथील मॉडेल शॉपमधील वादात दुकानातील कर्मचारी मनीष प्रजापती यांना जोरदार मारहाण झाली. डीएव्ही पदवी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी नेत्याचे नाव घेऊन, गुंडांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. या दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण मारहाणीची घटना कैद झाली आहे. 
 

Web Title: Manish Gupta's murder case is fresh while a man was beaten to death by a goon in the gorakhpur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.