विवस्त्र मृतदेहासाेबत नग्न हाेऊन काढली छायाचित्रे, साने याने गाठला वासनांधतेचा कळस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 06:51 AM2023-06-18T06:51:59+5:302023-06-18T06:52:09+5:30
साने याने सरस्वतीपासून लैंगिक आजाराची माहिती लपवली हाेती. त्याचे अन्य महिलांशी चालणारे चॅटिंग, पॉर्न व्हिडीओ बघणे आदीपैकी कोणत्या तरी कारणावरून वाद झाल्याची शक्यता पोलिस तपासत आहेत.
मीरा रोड : सरस्वती हत्याकांडातील आरोपी मनोज साने (५६) हा वासनांध असून सरस्वतीचे तुकडे करण्याआधी तिच्या विवस्त्र मृतदेहासोबत त्याने स्वतः नग्न होऊन छायाचित्रे काढली. नंतर त्याने पॉर्न व्हिडीओ पाहिल्याचे पाेलिस तपासात उघड झाले आहे. साने याने सरस्वतीपासून लैंगिक आजाराची माहिती लपवली हाेती. त्याचे अन्य महिलांशी चालणारे चॅटिंग, पॉर्न व्हिडीओ बघणे आदीपैकी कोणत्या तरी कारणावरून वाद झाल्याची शक्यता पोलिस तपासत आहेत.
सरस्वतीची हत्या आपण केली नाही तर तिने विष पिऊन आत्महत्या केली, असे साने हा पोलिसांना सातत्याने सांगत आहे; मात्र कीटकनाशक हे साने यानेच बोरिवलीच्या बाभई येथील आदर्श नर्सरीतून खरेदी केले हाेते. त्याच्या घरात सापडलेली कीटकनाशकाची बाटली ही त्याच दुकानातून खरेदी केल्याचे बाटलीवरील बॅच क्रमांकावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साने यानेच सरस्वतीला विषारी द्रव्य देऊन मारल्याची दाट शक्यता आहे.
मनोज साने याने ४ जूनला सरस्वतीची हत्या केल्यानंतर पोलिसांना पुरावे सापडू नये म्हणून प्लास्टिक पिशवीत भरलेले तुकडे पिशवीसह न टाकता ते पिशवी उघडून टाकणार होता. अशा पद्धतीने ताे मृतदेहाची विल्हेवाट लावणार होता. त्यात तो यशस्वी झाला असता तर सरस्वतीच्या निर्घृण हत्याकांडाचा थांगपत्ता लागला नसता; मात्र शेजारी राहणाऱ्या तरुणास ६ जूनला साने याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले आणि त्याने नयानगर पोलिसांना कळवल्याने हे हत्याकांड उघड झाले.
मनोवैज्ञानिक चाचणी
आरोपी साने याने कटकारस्थान करून सरस्वती वैद्य हत्याकांड घडवून आणले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तो पोलिसांना तपासात सहकार्य न करता दिशाभूल करणे, खोटी माहिती देणे आदी प्रकार करत आहे. त्यामुळे पोलिसांनी साने याची मुंबईच्या जेजे रुग्णालयात गुरुवारपासून मनोवैज्ञानिक चाचणी सुरू केली आहे. गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवस चाचणी झाली असून आता सोमवारी पुन्हा चाचणीसाठी नेण्यात येणार आहे.