Mansukh Hiren Case : मनसुख हिरेन आणि सचिन वाझेंमधील संबंधांबाबत हिरेन यांच्या वकिलांचा मोठा गौप्यस्फोट, केला असा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 05:06 PM2021-03-13T17:06:55+5:302021-03-13T17:13:33+5:30
Mansukh Hiren's Lawyer's statement about Sachin vaze : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारा धक्कादायक गौप्यस्फोट मनसुख हिरेन आणि कुटुंबीयांचे वकील गिरी यांनी केला आहे.
मुंबई - अंबानींच्या घराशेजारी सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडालेली आहे. (Mansukh Hiren Case) त्यात या मृत्यूबाबत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. (Mansukh Hiren's Lawyer's statement about Sachin vaze ) त्यातच आता या प्रकरणाला नवे वळण देणारा धक्कादायक गौप्यस्फोट मनसुख हिरेन आणि कुटुंबीयांचे वकील गिरी यांनी केला आहे. (Mansukh Hiren's lawyers big claim about relation between Mansukh Hiren & Sachin Waze )
मनसुख हिरेन यांना सल्ला देणारे वकील गिरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मनसुख हिरेन यांची गाडी १७ फेब्रुवारीला चोरीला गेली होती. १८ तारखेला त्यांनी विक्रोळी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर ही गाडी अंबानींच्या घराशेजारी स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत सापडली होती. त्यानंतर मनसुख हिरेन यांच्यामागे पोलीस आणि माध्यमांचा ससेमिरा लागला होता. त्यामुळे हिरेन यांनी माझ्याकडून याबाबत कायदेशीर सल्लाही घेतला होता.
मनसुख हिरेन यांना झालेल्या त्रासाबाबत त्यांच्या वकिलांनी सांगितले की, दर एक दोन तासांनी कुठून ना कुठून पोलीस यायचे, प्रश्नांची सरबत्ती केली जायची. कुटुंबीयांना झोपू दिले जात नसे. प्रसारमाध्यमांकडूनही विचारणा व्हायची. त्यामुळे मनसुख हिरेन आणि त्यांचे कुटुंबीय त्रस्त होते. मात्र सचिन वाझेंबाबत त्यांनी मला काही सांगितले नव्हते. उलट सचिन वाझे हे आपले मित्र आहेत. त्यांना माझी मदत करायची आहे, असे त्यांनी मला सांगितले होते, असा दावा हिरेन यांचे वकील गिरी यांनी केला.
दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘ॲन्टिलिया’ निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी निगडित महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकासह (एटीएस) रोज वेगवेगळ्या यंत्रणांकडून, च्च पातळीवर तपास करत आहे. त्याच अनुषंगाने हिरेन यांच्या कुटुंबीयांना रोज वेगवेगळ्या चौकशींना सामोरे जावे लागत असल्यामुळे हे कुटुंब हैराण झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
दुसरीकडे मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी वादग्रस्त एपीआय सचिन वाझे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.