Mansukh Hiren : 'त्या' व्होल्वोत दडलंय काय?, एटीएसने जप्त केलेल्या या कारची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 08:01 PM2021-03-23T20:01:22+5:302021-03-23T20:03:38+5:30

Mansukh Hiren : टीएसचे पथक चौकशीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून दीव दमण येथे तपासकामी रवाना झाले. नंतर गुन्ह्यात वापरलेली व्होल्वो कार आणि संशयित व्यक्तीस २३ मार्चला एटीएसने ताब्यात घेतेले.

Mansukh Hiren : Is 'that' hidden in the Volvo? Forensic team investigates the car seized by ATS | Mansukh Hiren : 'त्या' व्होल्वोत दडलंय काय?, एटीएसने जप्त केलेल्या या कारची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी 

Mansukh Hiren : 'त्या' व्होल्वोत दडलंय काय?, एटीएसने जप्त केलेल्या या कारची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी 

googlenewsNext
ठळक मुद्दे मोबाईल चार्जर, एक मास्क, शर्ट पॅन्टचे तीन जोड आणि टॉवेल असं सामान मिळाले आहे. आणखीही या मोटारीतून काही मिळते का याचीही चाचपणी केली जात आहे.

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवणाऱ्या सचिन वाझे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे वापरत असल्याचा संशय असलेली एक व्होल्वो कार दीव  दमण येथून सोमवारी महाराष्ट्र एटीएसने जप्त केली. याच कारची आता ठाणे एटीएसच्या आवारात मुंबईच्या न्यायवैद्यक विभागाच्या विशेष पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. या मोटारीतून दोन बॅगा हस्तगत करण्यात आल्या आहेत. या बॅगांमध्ये काही कपडे आणि वस्तू मिळाल्या आहेत. यात मोबाईल चार्जर, एक मास्क, शर्ट पॅन्टचे तीन जोड आणि टॉवेल असं सामान मिळाले आहे. आणखीही या मोटारीतून काही मिळते का याचीही चाचपणी केली जात आहे.

 

चौकशीत प्राप्त झालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या सिमकारचा शोध लावला. गुन्ह्यात वापरलेले सिमकार्ड हे मुंबईतील पात्याच्या क्लब आणि बेटिंग घेणाऱ्या व्यक्तीने वाझेंच्या सांगण्यावरून त्याच्याकडे काम करणाऱ्या बुकीने गुजरात येथील त्याच्या ओळखीच्या इसमांकडून प्राप्त केली. ती सिमकार्ड ही गुजरातच्या एका कंपनीच्या नावे खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीत ती सिमकार्ड बुकी नरेश गोरने सचिन वाझेच्या सांगण्यावरून आरोपी विनायक शिंदेला दिली. गोर यांच्यामार्फत १४ सिमकार्ड मागवलेली. त्यापैकी काही सिमकार्ड ऍक्टिव्ह करून शिंदेकडे दिल्याचे व शिंदेने ती सिमकार्ड इतरांकडे देऊन त्याचा वापर गुन्ह्यात केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. हि सिमकार्ड ज्या मोबाईलमध्ये वापरले गेले त्यापैकी काही मोबाईल आणि सिमकार्ड आरोपींनी नष्ट केले असल्याचे चौकशीत स्पष्ट होत आहे. नंतर एटीएसचे पथक चौकशीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून दीव दमण येथे तपासकामी रवाना झाले. नंतर गुन्ह्यात वापरलेली व्होल्वो कार आणि संशयित व्यक्तीस २३ मार्चला एटीएसने ताब्यात घेतेले. या व्होल्वो कारची एफएसएल कालिना यांच्याकडून तपासणी सुरु आहे. या गुन्ह्यात संशयितांची सखोल चौकशी झाल्यानंतर आणखी काही व्यक्तींना अटक होण्याची शक्यता एटीएसने वर्तवली आहे. 

एटीएसच्या तपासामुळे कहानी में ट्विस्ट महाराष्ट्र एटीएसने जप्त केलेली व्होल्वो मनिष भतिजांची? मनिष भतिजा देवेंद्र...

Posted by Nationalist Congress Party - NCP on Tuesday, March 23, 2021

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करत असलेल्या एटीएसने एक व्होल्वो कार जप्त केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीने संशयाची सुई थेट फडणवीस यांच्या निकटवर्तीयाकडे वळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबूक पेजवरून यासंदर्भातील एक पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, एटीएसने तपासादरम्यान जी व्होल्वो कार ताब्यात घेतली आहे ती बिल्डर मनिष भतिजा यांची असल्याचे समजते. मनिष भतिजा यांचे राजकीय व व्यावसायिक लागेबांधे भाजपा नेत्यांकडे जातात, असा संशय या पोस्टमधून व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Mansukh Hiren : Is 'that' hidden in the Volvo? Forensic team investigates the car seized by ATS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.