Sachin Vaze: सचिन वाझेच्या CIU कार्यालयाची झाडाझडती; कपाटात सापडली ‘अशी’ वस्तू, ज्यामुळे NIA ही चक्रावली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 10:33 AM2021-06-29T10:33:48+5:302021-06-29T10:37:48+5:30

Mukesh Ambani bomb threat: सचिन वाझे सध्या अटकेत आहे. NIA एँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास करत आहे.

Mansukh Hiren Murder Case: NIA Recovered Hammer In Antilia Bomb Scare Case From Sachin Vaze | Sachin Vaze: सचिन वाझेच्या CIU कार्यालयाची झाडाझडती; कपाटात सापडली ‘अशी’ वस्तू, ज्यामुळे NIA ही चक्रावली

Sachin Vaze: सचिन वाझेच्या CIU कार्यालयाची झाडाझडती; कपाटात सापडली ‘अशी’ वस्तू, ज्यामुळे NIA ही चक्रावली

googlenewsNext
ठळक मुद्देएँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे कोठडीत आहे. NIA विविध ठिकाणी धाडी टाकून महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्य पुरावा म्हणून जमा करत आहेतजेव्हा सचिन वाझे अटक झाले तेव्हा त्यांच्याकडून नोटा मोजण्याची मशीनही जप्त करण्यात आली.

मुंबई – एखाद्या एन्काऊंटर स्पेशालिस्टकडे रिवॉल्वर अथवा कारतूस सापडले तर आश्चर्याची गोष्ट नाही. परंतु कोणत्या एन्काऊंटर स्पेशालिस्टकडे हातोडा सापडला तर तपास यंत्रणा चक्रावते. पडद्यामागे काही तरी मोठा डाव आहे या संशयाने तपास करते. मनसुख हिरेन हत्या(Mansukh Hiren) आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या एँटेलिया बंगल्याबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझेच्या हातोड्याची अशीच कहानी समोर आली आहे.

सचिन वाझे सध्या अटकेत आहे. NIA एँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास करत आहे. या तपासात NIA विविध ठिकाणी धाडी टाकून महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्य पुरावा म्हणून जमा करत आहेत. यात एक हातोडाही सापडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन वाझेच्या मुंबई पोलीस मुख्यालयातील CIU कॅबिनमध्ये एका कपाटात हातोडा सापडला आहे. जेव्हा सचिन वाझे अटक झाले तेव्हा त्यांच्याकडून नोटा मोजण्याची मशीनही जप्त करण्यात आली.

पुरावे नष्ट करण्यासाठी हातोड्याचा वापर

सचिन वाझेविरोधात लाचलुचपत विभागानेही तपास सुरू केला आहे. सचिन वाझेच्या कार्यालयातील कपाटात सापडलेल्या हातोड्याचा वापर एँटेलिया स्फोटक प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तपासात सचिन वाझेकडून अनेक लग्झरी गाड्या जप्त करण्यात आल्या. या गाड्यांचे नंबरही बदलण्यात आले होते.

२५ फेब्रुवारी मुकेश अंबानी यांच्या एँटेलिया बंगल्याबाहेर जी स्कोर्पिओ गाडी आढळली. त्या गाडीचा नंबर रस्त्यातच बदलला असल्याचं सीसीटीव्हीत कळालं. नंबर प्लेट बदलून नवीन नंबर प्लेट लावण्यासाठी कधीकधी हातोड्याची गरज भासते. सचिन वाझे या हातोड्याचा वापर नंबर प्लेट बदलण्यासाठी केलाय का? याबाबत NIA च्या चार्जशीटमधून खुलासा होऊ शकतो.   

प्रदीप शर्माला १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

एँटेलिया स्फोटक कार प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेला माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यासोबत आनंद जाधव व संतोष शेलार या दोघांनाही १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तर मनीष सोनी आणि सतीश मोटेकर यांच्या एनआयए कोठडीत १ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर संतोष शेलार व आनंद जाधव हे दिल्लीसह अन्य शहरांचा फेरफटका मारून आले होते, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तपासात समोर आले आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या या प्रवासाचा खर्च अन्य व्यक्तीने केला होता. ती व्यक्ती नेमकी कोण, याचा एनआयएकडून कसून तपास सुरू आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

Read in English

Web Title: Mansukh Hiren Murder Case: NIA Recovered Hammer In Antilia Bomb Scare Case From Sachin Vaze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.