Mansukh Hiren : हत्या, गुन्हेगारी कट, पुरावे नष्ट करणे; मनसुख हिरेन प्रकरणी एटीएसनं दाखल केला FIR

By पूनम अपराज | Published: March 7, 2021 07:16 PM2021-03-07T19:16:59+5:302021-03-07T19:20:07+5:30

Mansukh Hiren : याप्रकरणी हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एटीएसने आज रीतसर गुन्हा दाखल केला आहे. 

Mansukh Hiren : Murder, criminal conspiracy, destruction of evidence; ATS files FIR in Mansukh Hiren case | Mansukh Hiren : हत्या, गुन्हेगारी कट, पुरावे नष्ट करणे; मनसुख हिरेन प्रकरणी एटीएसनं दाखल केला FIR

Mansukh Hiren : हत्या, गुन्हेगारी कट, पुरावे नष्ट करणे; मनसुख हिरेन प्रकरणी एटीएसनं दाखल केला FIR

Next
ठळक मुद्देएटीएसने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलीस स्टेशनकडून हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे.

गेल्या शुक्रवारी मुंब्रा रेतीबंदर खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर राज्याच्या गृह विभागाच्या आदेशानुसार ठाणे शहर पोलीस यांचेकडून मनसुख हिरेन यांच्या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. याप्रकरणी हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एटीएसने आज रीतसर गुन्हा दाखल केला आहे. 


एटीएसने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलीस स्टेशनकडून हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे. त्यानुसार आज भा दं वि कलम 302,201,34,120 - B  प्रमाणे हिरेन यांच्या पत्नी विमला मनसुख हिरेन यांचे फिर्यादीवरून एटीएसने गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिरेन यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्या असून त्याचा मृतदेह १० तास पाण्यात होता असल्याची शक्यता शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होत आहे. 

शवविच्छेदन अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांच्या डोळ्याजवळ आणि चेहऱ्यावर छोट्या जखमा होत्या. तसेच त्यांच्या पाठीवर दोन ठिकाणी जखमा असल्याचे बोललं जात आहे. जर मनसुख  हिरेन यांनी आत्महत्या केली असेल तर एकाच बाजूला जखमा होणे अपेक्षित होते. मात्र दोन्ही बाजूला झालेल्या जखमांमुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढलं आहे.  हे संपूर्ण प्रकरणच संशयास्पद असून चांगले स्वीमर असलेले मनसुख हे आत्महत्या करुच शकत नाही, असा दावा करीत या कुटूंबियांनी याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करुन अखेर पत्नी विमला यांच्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी खून आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दहशतवादविरोधी पथक, मुंबई येथे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मनसुख हिरेन यांचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्याचा अहवाल ठाणे पोलिसांना मिळाला आहे. मनसुख हिरेन यांचा बुडून मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मनसुख हिरेन यांचा व्हिसेरा पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहे. 

 

Web Title: Mansukh Hiren : Murder, criminal conspiracy, destruction of evidence; ATS files FIR in Mansukh Hiren case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.