ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली ; किरीट सोमय्या यांचा ठाकरे सरकारवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 02:02 PM2021-03-17T14:02:52+5:302021-03-17T14:05:17+5:30

Kirit Somaiya on Mansukh Hiren Death : बुधवारी शहरातील कोविड लसीकरण केंद्रांना भेटी देण्यासाठी किरीट सोमय्या भिवंडीत आले होते.

Mansukh Hiren murdered by Thackeray government's Waze gang; Kirit Somaiya allegations on Thackeray government | ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली ; किरीट सोमय्या यांचा ठाकरे सरकारवर आरोप

ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली ; किरीट सोमय्या यांचा ठाकरे सरकारवर आरोप

googlenewsNext
ठळक मुद्दे मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अपारदर्शकपणे व घाईघाईने ५ जून २०२० रोजी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेतले यामागे नेमकी काय हेतू होता

नितिन पंडीत

भिवंडी - ठाकरे सरकारच्या ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली असा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी भिवंडीत केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी शहरातील कोविड लसीकरण केंद्रांना भेटी देण्यासाठी किरीट सोमय्या भिवंडीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी ठाकरे सरकारवर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आरोप केला. यावेळी बोलतांना सोमय्या म्हणाले कि आपण कालच हिरेन परिवाराची भेट घेतली असून या भेटी दरम्यान हिरेन परिवार प्रचंड तणावात असल्याचे मला आढळले असून ठाकरे सरकारच्या वाझे गँग कडून त्यांच्या पत्नी व परिवाराला धमक्या येत असल्याने हिरेन परिवाराला सुरक्षा पुरविण्यात यावी अशी विनंती व मागणी लेखी पत्राद्वारे आपण एनआयए यंत्रणा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले. 

त्याचबरोबर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अपारदर्शकपणे व घाईघाईने ५ जून २०२० रोजी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेतले यामागे नेमकी काय हेतू होता याची देखील चौकशी व्हावी अशा मागणीचे पत्र देखील आपण एनआयएला दिले असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. 

तर या हिरेन प्रकरणात भाजपचा हात असल्याचा आरोप व ट्विट काँग्रेसचे सचिन सावंत यांनी केला असून याबत सोमय्या यांना विचारले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , गृहमंत्री अनिल देशमुख व काँग्रेसचे सचिन सावंत हे हिरेन प्रकरण भरकटविण्याचा प्रयत्न करत असून सरकार तुमचा , पोलीस तुमचे वाझेही तुमचाच मग हिरेन प्रकरणात पंधरा दिवस सरकार व पोलीस झोपा काढत होते काय ? की हे सर्व जण ५० कोटींच्या वासुलीत व्यस्त होते असा प्रती सवाल व आरोप देखील सोमय्या यांनी केला असून सचिन वाझेचा बोलविता धनी देखील तुरुंगात जाणार असल्याचा विश्वास सोमय्या यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Web Title: Mansukh Hiren murdered by Thackeray government's Waze gang; Kirit Somaiya allegations on Thackeray government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.