प्रियकराला भेटण्यासाठी 'ओम फट्ट स्वाहा', मांत्रिकाकडून ८ लाख ९५ हजारांचा गंडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 06:46 AM2022-08-24T06:46:26+5:302022-08-24T06:47:04+5:30

ब्रेकअप झालेल्या प्रियकराची पुन्हा भेट घडवून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने खारघरमध्ये राहणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणीकडून ऑनलाइन ८ लाख ९५ हजारांची रक्कम उकळून तिची फसवणूक

mantrik looted over 8 lakh 95 thousand from girl in navi mumbai | प्रियकराला भेटण्यासाठी 'ओम फट्ट स्वाहा', मांत्रिकाकडून ८ लाख ९५ हजारांचा गंडा!

प्रियकराला भेटण्यासाठी 'ओम फट्ट स्वाहा', मांत्रिकाकडून ८ लाख ९५ हजारांचा गंडा!

googlenewsNext

पनवेल-

ब्रेकअप झालेल्या प्रियकराची पुन्हा भेट घडवून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने खारघरमध्ये राहणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणीकडून ऑनलाइन ८ लाख ९५ हजारांची रक्कम उकळून तिची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील भामट्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला असल्याचे खारघर पोलिसांनी सांगितले. 

या तरुणीचे नांदेड येथे राहणाऱ्या तरुणासोबत काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणांमुळे ते तुटले. तरुणीने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. मात्र, संपर्क होत नसल्याने वशीकरणाचा आधार घेण्याचा तिने प्रयत्न केला. रुखसार नावाच्या महिलेशी संपर्क साधला. तिने खानसाहेब जादुई शक्तीने प्रियकराला तिच्यापर्यंत घेऊन येईल असे सांगितले. त्यानुसार तरुणीने खानसाहेबशी संपर्क साधला. खानसाहेबने मागणी केल्यानुसार तरुणीने प्रियकराचा फोटो आणि ५० हजार रुपये पाठवून दिले. 

मैत्रिणीचा सल्ला मोलाचा
तरुणीने खानसाहेबकडे आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केल्यानंतर भामट्याने आपला मोबाइल बंद करुन टाकला. त्यानंतर या तरुणीने आपल्या मैत्रिणीसोबत सल्लामसलत करुन खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी खानसाहेबविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे.

Web Title: mantrik looted over 8 lakh 95 thousand from girl in navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.