Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर होते बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी, तपासात धक्कादायक प्लान उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 09:23 PM2022-06-10T21:23:36+5:302022-06-10T21:25:40+5:30

Lawrence Bishnoi Gang : गुरुवारी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. आता असे समोर आले आहे की, लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर बॉलीवूडमधील अनेक मोठी नावे आहेत.

Many Bollywood celebrities were on the radar of Lawrence Bishnoi gang, investigation reveals shocking plan | Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर होते बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी, तपासात धक्कादायक प्लान उघड

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर होते बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी, तपासात धक्कादायक प्लान उघड

googlenewsNext

Lawrence Bishnoi Gang: पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या आणि बॉलिवूड स्टार सलमान खानला धमकीचे पत्र या दोन्ही प्रकरणांचे दुवे लॉरेन्स बिश्नोई गॅंगशी जोडले जात आहेत. एकीकडे मुंबई पोलीस, गुन्हे शाखा, महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलीस स्पेशल सेलची टीम सलमान खानला दिलेल्या धमकीच्या प्रकरणावर तपास करत आहे, तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी नुकतीच सौरभ महाकाल उर्फ ​​सिद्धेश कांबळे (20) याला अटक केली आहे.

गुरुवारी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. आता असे समोर आले आहे की, लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर बॉलीवूडमधील अनेक मोठी नावे आहेत. ही टोळी या सेलिब्रिटींकडून वसुली करण्याचा डाव आखत होती. या प्रकरणात अनेक मोठी नावे समोर आली असून तपास यंत्रणा आता त्यांच्याकडून अधिक माहिती काढत आहेत.

सौरभ महाकाल याच्यासोबत आणखी २ जण काम करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. पुणे पोलिसांच्याही रडारवर १० हून अधिक लोक आहेत, जे बिश्नोई टोळीसाठी काम करत होते. ही गॅंग पुण्याच्या आसपास आपली एक टीम बनवत होती. आता महाकालच्या टीममधील कोण कोण होते, याचा तपास एजन्सी करत आहेत.

सलमान खानला धमकीचे पत्र पाठवणारा मास्टरमाईंड, कोण आहे विक्रमजीत बरार?

बिश्नोई टोळीने सलमानला धमकीचे पत्र पाठवले होते
अलीकडे, पोलिसांनी सांगितले होते की, लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या तीन गुंडांनी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र पाठवले होते आणि ते गुंड विक्रम बरारच्या कटाचा एक भाग होते, ज्याचा उद्देश पिता-पुत्रांना धमकावून खंडणी उकळण्याचा होता. विक्रम बरार हा कॅनडामध्ये राहणारा गँगस्टर गोल्डी बरारचा भाऊ आहे.
 
गोल्डी हा बिश्नोई टोळीचा भाग असून त्याने मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक आले आहे. सध्या फरार असलेला टोळीचा सदस्य संतोष जाधव याच्या ठावठिकाणाबाबत काही सुगावा मिळणे हा चौकशीचा उद्देश आहे.

Web Title: Many Bollywood celebrities were on the radar of Lawrence Bishnoi gang, investigation reveals shocking plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.