Maratha Kranti Morcha मानखुर्दमध्ये बस जळीतकांडप्रकरणी तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 06:09 PM2018-07-27T18:09:38+5:302018-07-27T18:10:10+5:30
Maratha Kranti Morcha याप्रकरणी महेंद्र शिंगारे (वय- ३८), पंकज थोरात (वय - ३६) आणि अजित सरवणे (वय - २२) या तिघांना मानखुर्द पोलिसांनी केली अटक
मुंबई - २५ जुलै रोजी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या मुंबई बंद पुकारण्यात आला होता. या बंददरम्यान बेस्टची बस जाळण्यात आली होती. याप्रकरणी महेंद्र शिंगारे (वय- ३८), पंकज थोरात (वय - ३६) आणि अजित सरवणे (वय - २२) या तिघांना मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संबंध मुंबईत या बंददरम्यान सुरुवातीपासून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शांततेत सुरु असलेल्या बंदला मानखुर्दमध्ये बस जाळल्याने हिंसेचे गालबोट लागले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पेटून दिलेल्या बसची आग विझवली. याप्रकरणी मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात आलेल्या व्हिडिओची पोलिसांनी पाहणी केली. या व्हिडिओत महेंद्र, पंकज आणि अजित हे तिघे दुचाकीचे पेट्रोल बसवर फेकून आग भडकवत असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार पोलिसांनी या तिघांना मानखुर्द परिसरातून अटक केली. या तिघांविरोधात सरकारी मालमत्तेची नुकसानी करणे, दंगल भडकविणे याअंतर्गत मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.