बालकलाकार साईशा भोईर हिच्या आईवर फसवणुकीचा गुन्हा; जोडप्याला १६ लाखांचा गंडा

By गौरी टेंबकर | Published: May 17, 2023 06:49 PM2023-05-17T18:49:44+5:302023-05-17T19:03:58+5:30

शैक्षणिक संस्थेच्या संचालकाला घातला गंडा, झाडाझडतीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती

Marathi Child Artist Saisha Bhoir Mother Pooja Bhoir booked for cheating fraud case filed against her for 16 Lakh Rupees | बालकलाकार साईशा भोईर हिच्या आईवर फसवणुकीचा गुन्हा; जोडप्याला १६ लाखांचा गंडा

बालकलाकार साईशा भोईर हिच्या आईवर फसवणुकीचा गुन्हा; जोडप्याला १६ लाखांचा गंडा

googlenewsNext

गौरी टेंबकर-कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: मराठी मालिकांमुळे घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध बालकलाकार तसेच चाईल्ड मॉडेल साईशा भोईर हिच्या आईने गुंतवणूकीवर उत्तम परतावा देते असे सांगत शैक्षणिक संस्थेचे संचालक आणि त्यांच्या पत्नीला मिळून १६ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी पूजा भोईर या महिलेवर फसवणूक तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. तसेच कफ परेड रोड पोलिसांनी पूजा भोईरच्या कल्याण मधील घरात छापमारी करत पूजा भोईरला ताब्यात घेतले असल्याचीही माहिती आहे.

तक्रारदार मयुरेश पत्की (३३) हे कुलाबाचे राहणारे असून जनजागृती शिक्षण मंडळ या शैक्षणिक संस्थेचे ते संचालक असून ते पत्नी नेहा (३३) यांच्यासोबत राहतात. त्यांचे कार्यालय हे सांगली चौक येथे असून ते दर आठवड्याला कामानिमित्त तिथे जात असतात.  नोव्हेंबर,२०२२ मध्ये नेहा यांची इंस्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमावर आरोपी पूजाशी ओळख झाली. नेहा या पूजाची मुलगी साईशाचा अभिनय आवडत असल्याने त्या तिच्या फॅन झाल्या. त्यामुळे त्या साईशा भोईर या नावाने असलेल्या अकाउंटला नेहमी फॉलो करायच्या जे पूजा हँडल करत होती त्यामुळे नेहा तिलाही फॉलो करायच्या. या मैत्री दरम्यान नेहाने पूजाचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्यांची मैत्री झाली. 

आठवड्याला १०.१० टक्के नफा!

पुजाचा ऑप्शन्स स्ट्रॅटेजी मॉडेल नावाने गुंतवणुकीचा व्यवसाय असून त्यावर दर आठवड्याला १०.१० टक्के नफा मिळवून देण्याचे आम्ही तिने नेहा यांना दाखवला. इतकेच नव्हे तर तिने मयुरेश यांनाही गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने ६ आणि १० मिळून १६ लाख रुपये पूजाच्या कंपनीत गुंतवले. तिने ५ डिसेंबर २०२२ रोजी एकूण नफ्यातील ३० टक्के कमिशन कापत उरलेले पैसे दोघांच्याही बचत खात्यावर जमा केले. दुसरा महिन्यातही तिने परतावा दिला. मात्र त्यानंतरच्या परताव्याबाबत ती टाळाटाळ करू लागली आणि त्यामुळे व्यवसायिकाने १० फेब्रुवारी २०२३ रोजी गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली. पूजा ने त्यांना १७ फेब्रुवारीला दोन चेक नोकरामार्फत एस एसएआय ॲडव्हायझर इन्व्हेस्टमेंट या नावाने दिले. २८ फेब्रुवारी पर्यंत रक्कम जमा न झाल्यास ते चेक बँकेत भरायला पूजाने पत्कींना सांगितले जे बाऊन्स झाले. 

उर्मट भाषेत उत्तर... नोटीस पाठवली, घरात झाडाझडती करून घेतलं ताब्यात

चेक बाउन्स झाल्याचे नेहा यांनी फोन करून पूजाला सांगितले त्यावेळी तुम्ही मला सांगून बँकेत चेक जमा केले होते का? असे उर्मट उत्तर पूजा ने दिले. मात्र पूजेला मेलवर आणि व्हाट्सअप वर चेक डिपॉझिट केल्याबाबत अवगत केल्याचे पत्की यांचे म्हणणे आहे. पूजा ने ११ मार्चला १ लाख परत केले मात्र उर्वरित पैसे देण्याबाबत प्रतिसाद देणे बंद केले. पूजाला पत्की यांनी १५ मार्च रोजी वकिलाकडून  नोटीसही पाठवली ज्याला तिने उत्तर दिले नाही आणि टाळाटाळ करू लागली. अखेर फसवणुकीप्रकरणी पत्की दांपत्याने पोलिसात धाव घेतली. साईशा भोईरच्या आईच्या विरोधात कफ परेड पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून आज पोलिसांनी साईशाच्या कल्याण मधील घरात झाडाझडती घेतली. अखेर याप्रकरणी कफ परेड रोड पोलिसांनी पूजा भोईरच्या कल्याण मधील घरात छापमारी करत पूजा भोईरला ताब्यात घेतले आहे.

मराठी मालिकांमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारणाऱ्या चिमुरडीचे नाव आहे “साईशा भोईर”. साईशा भोईर ही चाईल्ड मॉडेल आहे. काही नामांकित ब्रँड साठी तिने रॅम्पवॉक केले आहे. साईशा आणि तिचे कुटुंब कल्याणला वास्तव्यास आहे. तिचे वडील विशांत भोईर यांना म्युजिकची आणि ट्रॅव्हलिंगची आवड आहे. साईशा युट्युब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर नेहमी आपले व्हिडीओज अपलोड करत असते. तिच्या या वेगवेगळ्या व्हिडिओजना चाहत्यांकडून मोठी पसंती देखील मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नृत्य, अभिनय याशिवाय साईशा कुकिंग करतानाचे व्हिडीओज देखील अपलोड करताना दिसते. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Web Title: Marathi Child Artist Saisha Bhoir Mother Pooja Bhoir booked for cheating fraud case filed against her for 16 Lakh Rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.