भोसरीत अल्पवयीन मुलीचा विवाह ; बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 07:16 PM2018-10-12T19:16:30+5:302018-10-12T19:16:55+5:30
भोसरी येथे राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीला आई-वडील नाहीत.पीडित मुलगी पंधरा वर्षांची असून तिच्या आत्याने तिचा विवाह सध्या भोसरी येथे राहणाऱ्या(मूळ-कर्नाटक) येथील तरुणाशी लावून दिला.
पिंपरी : पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी मुलीच्या आत्यासह मुलीच्या पतीवर बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे घडली.
भोसरी येथे राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीला आई-वडील नाहीत. तिचा सांभाळ तिच्या आजीने केला. मात्र, चार वर्षांपूर्वी आजीचेही निधन झाल्यानंतर ती आत्याकडे राहत होती. दरम्यान, पीडित मुलगी पंधरा वर्षांची असून ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्या आत्याने तिचा विवाह सध्या भोसरी येथे राहणाऱ्या (मूळ-कर्नाटक) येथील तरुणाशी मे २०१७ मध्ये लावून दिला. त्यानंतर पीडित मुलीच्या पतीने भोसरी आणि कर्नाटक येथे नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या अत्याचाराला कंटाळून तिने गुरुवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक निरीक्षक व्ही. डी. देशमुख याबाबत अधिक तपास करत आहेत.