सदनिका घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 03:48 PM2018-12-22T15:48:29+5:302018-12-22T15:51:57+5:30
लग्नात दिलेले संसारपयोगी साहित्य मागितले असता, ते फिर्यादी विवाहित महिलेला दिले नाही, उलट
पिंपरी : लग्नात दिलेले संसारपयोगी साहित्य मागितले असता, ते फिर्यादी विवाहित महिलेला दिले नाही, उलट सदनिका घेण्यासाठी वडिलांकडून दहा लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी तगादा लावला. शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेने पतीसह सासू, सासरे,दीर यांच्याविरूद्ध दिघी पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन बिरुबा माने (वय ३२,रा. दिघी) यांच्यासह अन्य दिघांविरूद्ध विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी संगनमत करून विवाहितेला त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मोटार आणि सदनिका खरेदी करण्यासाठी वडिलांकडून दहा लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी वारंवार छळ करण्यात आला. शिवीगाळ, मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.