१३४ कोटीची संपत्ती असलेल्या युवकाशी लग्न केलं अन् २ तासात झाला संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 02:22 PM2023-05-25T14:22:20+5:302023-05-25T14:22:51+5:30

माझ्या मुलाने आत्महत्या केली आहे ही बाब मी स्वीकारत नाही. त्याच्या मृत्यूचे कारण वेगळे आहे असं मृत युवकाच्या आईने आरोप केला.

Married a young man with a wealth of 134 crores and died suspiciously within 2 hours | १३४ कोटीची संपत्ती असलेल्या युवकाशी लग्न केलं अन् २ तासात झाला संशयास्पद मृत्यू

१३४ कोटीची संपत्ती असलेल्या युवकाशी लग्न केलं अन् २ तासात झाला संशयास्पद मृत्यू

googlenewsNext

१८ वर्षाच्या कोट्यधीश युवकाचा लग्नाच्या काही तासांतच मृत्यू झाला आहे. तो शाळेत शिकायला होता. त्याला वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा प्राप्त झाला होता. या मुलाने समलैंगिक विवाह केला. ज्याच्याशी युवकाने लग्न केले त्याला केवळ दोनवेळाच भेटला होता अशी माहिती मृत युवकाच्या आईने दिली. मृत युवक सेंट्रल तैवानच्या ताइचुंग या शहरात वास्तव्यास होता. 

मृत्यूच्या काही दिवसापूर्वीच वडिलांनी त्यांच्या नावावर १३.११ मिलियन पाऊंड(जवळपास १३४ कोटी) संपत्ती नावावर केली होती. ४ मे रोजी या युवकाचा मृतदेह तो राहत असलेल्या एका अपार्टमेंटबाहेर संशयास्पदरित्या सापडला. मृत्यूच्या २ तासाआधी त्याने ज्या युवकाशी लग्न केले होते त्याची ओळख २६ वर्षीय हसिया अशी आहे. 

मृत युवकाच्या आईने घेतली पत्रकार परिषद
इंडिपेंडेंट यूके रिपोर्टनुसार, मृत लाई ची आई चेनने १९ मे रोजी पत्रकार परिषद घेत सांगितले की, माझ्या मुलाच्या मृत्यूमागे षडयंत्र आहे. माझा मुलगा गे नव्हता. तो हसियाला केवळ दोनवेळा भेटला होता. त्याच्या वडिलांचा एप्रिलमध्ये मृत्यू झाला होता. हसिया हा संपत्तीशी निगडीत दस्तावेज आणि आवश्यक कागदपत्रे बनवण्याचे काम करायचा. लाईचा ज्यादिवशी मृत्यू झाला त्यादिवशी हसियाने त्याला रिएल इस्टेट बिझनेस सांभाळण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. हसिया आणि लाईने रजिस्टर मॅरेज केले. त्यानंतर २ तासांत लाईच्या मृत्यूची बातमी समोर आली. 

माझ्या मुलाने आत्महत्या केली आहे ही बाब मी स्वीकारत नाही. त्याच्या मृत्यूचे कारण वेगळे आहे. संपत्तीच्या कारणास्तव त्याला मारण्यात आले असा आरोप युवकाच्या आईने केला. हसिया आणि मृत युवकाच्या वडिलांचे संबंध होते. हसिया लाईला केवळ २ वेळा भेटला होता. त्यातील दुसरी भेट ही लाईच्या वडिलांच्या मृत्यूनंतर झाली. सध्या पोलिसांनी संशयाच्या आधारे हसियाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याला कोर्टाने ८ लाख जामीनावर बाहेर सोडले आहे. हसिया आणि त्याच्या वडिलांची ५ तास चौकशी करण्यात आली. लाईच्या आईने केलेले आरोप एकतर्फी आहेत असा हसियाच्या वकिलांनी सांगितले. अद्याप लाईच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले नाही. पोस्टमोर्टम रिपोर्टची सगळे प्रतिक्षा करत आहेत. 

Web Title: Married a young man with a wealth of 134 crores and died suspiciously within 2 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.