सुड! विवाहित प्रेयसी तोडत होती नाते, रागाच्या भरात प्रियकराने केला ॲसिड हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 08:51 PM2022-01-09T20:51:22+5:302022-01-09T20:56:07+5:30

Acid Attack Case : पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Married girlfriend's relationship was breaking up, Acid attack by boyfriend | सुड! विवाहित प्रेयसी तोडत होती नाते, रागाच्या भरात प्रियकराने केला ॲसिड हल्ला

सुड! विवाहित प्रेयसी तोडत होती नाते, रागाच्या भरात प्रियकराने केला ॲसिड हल्ला

Next

पश्चिम बंगालमधील हुगलीत एका तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीवर आणि तिच्या आईवर ॲसिड फेकले. ज्यात दोघीही गंभीररित्या भाजल्या. तात्काळ दोघांनाही जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


प्रेयसी आणि आईवर तरुणाचा ॲसिड हल्ला

ही घटना हुगलीच्या उत्तरपारा पोलीस स्टेशन हद्दीतील कोननगरची आहे. येथे राहणाऱ्या एका विवाहितेचे शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत अवैध संबंध होते. मात्र काही मुद्द्यावरून दोघांमध्ये मतभेद झाले आणि महिलेने प्रियकरापासून दूर जाण्याचा प्रयत्न सुरू केला. यामुळे संतापलेल्या तरुणाने प्रियकराला धडा शिकवण्याचा कट रचला. संधी मिळताच आरोपीने कसा तरी प्रेयसीच्या घरी पोहोचला आणि जबरदस्तीने घरात घुसून प्रेयसी व तिच्या आईवर ॲसिड हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा जीव थोडक्यात बचावला मात्र, त्या गंभीररीत्या भाजल्या आहेत.


आई व मुलगी गंभीररित्या भाजली
प्रेयसी जोरजोरात आवाज करू लागली. त्यामुळे घटनास्थळी अनेकांची गर्दी झाल्याने आरोपीने गुन्हा करून तेथून पळ काढला. या महिलेचे मामा आणि सासरे दोघेही हुगलीच्या उत्तरपारा पोलिस स्टेशनअंतर्गत कोननगरच्या सूर्य सेन स्ट्रीट भागात आहेत. याआधीही आरोपीने अनेकदा हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे पीडितेने सांगितले.

पोलिसांनी आरोपीला अटक केली
या घटनेबाबत चंदननगर पोलिस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त डॉ अरविंद आनंद यांनी सांगितले की, या प्रकरणी लेखी तक्रार मिळाल्यानंतर उत्तरपारा पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी आरोपी विश्वनाथ भंडारी याला अटक करून कारागृहात पाठवले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७, ४४८, ३२३, ३२५, ३२६अ, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Married girlfriend's relationship was breaking up, Acid attack by boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.