दोन बायका फजिती ऐका! दोघींना एकत्र सोबत ठेवण्याच्या नादात गेला तुरूंगात, वाचा अजब घटना....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 01:10 PM2023-06-14T13:10:02+5:302023-06-14T13:10:11+5:30

Crime News : एका तरूणाचं लग्न 2016 मध्ये झालं होतं. त्याला मुले आहेत. पण तरूण फेसबुक एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडला. पोलिसांनुसार, तरूणाची इच्छा होती की, घरवालीसह त्याच्यासोबत बाहेरवाली सुद्धा रहावी.

Married man extra love affair love facebook ready to live with both wives wife take action | दोन बायका फजिती ऐका! दोघींना एकत्र सोबत ठेवण्याच्या नादात गेला तुरूंगात, वाचा अजब घटना....

दोन बायका फजिती ऐका! दोघींना एकत्र सोबत ठेवण्याच्या नादात गेला तुरूंगात, वाचा अजब घटना....

googlenewsNext

Crime News : अलिकडे सोशल मीडिया अनेक अनैतिक संबंधाच्या हैराण करणाऱ्या घटना समोर येत असतात. अशीच एक घटना बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये एका विवाहित व्यक्तीला फेसबुकवर एका विवाहित महिलेसोबत प्रेम झालं. जेव्हा पत्नीला पतीच्या अनैतिक संबंधांबाबत समजलं तेव्हा तिने पोलिसात तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी महिलेचा पती आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इथे राहणाऱ्या एका तरूणाचं लग्न 2016 मध्ये झालं होतं. त्याला मुले आहेत. पण तरूण फेसबुक एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडला. पोलिसांनुसार, तरूणाची इच्छा होती की, घरवालीसह त्याच्यासोबत बाहेरवाली सुद्धा रहावी. जेव्हा तरूणाच्या पत्नीला पतीच्या अफेअरबाबत समजलं तेव्हा तिने याचा विरोध केला.

यानंतर तरूण घरातून फरार झाला आणि मंदिरात प्रेयसीसोबत लग्न केलं. मंगळवारी तरूण आणि त्याची प्रेयसी पळून जाण्याच्या तयारीत होते. तेव्हा त्याच्या पत्नीला याची माहिती मिळाली. तरूणाच्या पत्नीने लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी तरूण आणि त्याच्या प्रेयसीला पकडलं. तरूणाची पत्नी आता न्यायाची मागणी करत आहे.

तरूणाच्या पत्नीने सांगितलं की, तिचा पती चार दिवसांआधी कामासाठी बाहेर गेला होता, पण घरी परतला नाही. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मग आम्हाला समजलं की, पती दुसऱ्या विवाहित महिलेसोबत फरार झाला आहे. आज माझ्या पतीचा फोन आला आणि म्हणाला की, 5 हजार रूपये, कपडे आणि आधार कार्ड घेऊन तुम्ही केजरीवाल हॉस्पिटलमध्ये पोहोचा. यानंतर मी लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी त्याला अटक केली.

तरूणाची पत्नी म्हणाली की, पती ज्या महिलेसोबत पळून गेला ती त्याला फेसबुकच्या माध्यमातून भेटली होती. त्या महिलेला सुद्धा मुलं आहेत. ज्यांना सोडून ती पळाली आहे. माझी अशी इच्छा आहे की, दोघांनाही शिक्षा व्हावी. त्या दोघांनी माझी आणि माझ्या मुलांचं जीवन बर्बाद केलं आहे.
तेच तरूणाने याबाबत सांगितलं की, 7 महिन्यांआधी फेसबुकवर एका महिलेसोबत माझं बोलणं झालं होतं. त्यानंतर तिने तिचा नंबर दिला. बोलता बोलता आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो. 5 महिन्यांआधी आम्ही दोघांनी लग्न केलं. मी माझ्या दोन्ही पत्नींना सोबत ठेवण्यासाठी तयार आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

Web Title: Married man extra love affair love facebook ready to live with both wives wife take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.