विवाहित पुरुषाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; अकोल्यात नेऊन केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 06:42 PM2021-05-17T18:42:37+5:302021-05-17T18:43:41+5:30
Kidnap And Rape : विवाहित आरोपीला अटक, फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील घटना
अमरावती : एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पाच महिन्यांपूर्वी पळवून नेऊन तिच्यावर अकोला येथे आरोपीने लैगिंक अत्याचार केल्याची घटना फ्रेजरपुरा ठाणे हद्दीत रविवारी उघडकीस आली. ३६ वर्षीय आरोपी हा विवाहित असून, त्याचेविरुद्ध एका वर्षापूर्वीसुद्धा पीडितेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीससूत्रानुसार, दुर्गेश राजेश पिछेल (३६, रा. फ्रेजरपुरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी रविवारी अटक केली. न्यायालयामसोर हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सदर आरोपीचे पीडितेशी प्रेमसंबंध होते. त्यातून त्याने एक वर्षापूर्वी तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यानुसार ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला २ जानेवारी २०२१ रोजी फूस लावून पळविल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार, भादंविचे कलम ३६३ नुसार गुन्हा नोंदविला. या घटनेचा तपास करीत असताना मुलगी व आरोपी अकोला येथे असल्याचे फोन लोकेशन ट्रेस झाले. त्यानुसार पोलिसांनी अकोला येथे जाऊन आरोपीला व मुलीला ताब्यात घेतले. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७६, (२),(एन) सहकलम ४,६ पोक्सो प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.