बापरे! विवाहित पुतणी काकासोबत पळाली, 2 लाख, दागिने केले लंपास; 4 महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 12:50 PM2023-02-15T12:50:21+5:302023-02-15T12:51:14+5:30

घरातून दोन लाख रुपये रोख आणि दीड लाखांचे दागिने घेऊन महिला प्रियकरासह फरार झाली.

married niece eloped with uncle in haryana | बापरे! विवाहित पुतणी काकासोबत पळाली, 2 लाख, दागिने केले लंपास; 4 महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

बापरे! विवाहित पुतणी काकासोबत पळाली, 2 लाख, दागिने केले लंपास; 4 महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

googlenewsNext

हरियाणातील एका गावात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एक काका त्याच्या विवाहित पुतणीसह पळून गेल्याची घटना घडली. हे प्रकरण नूंह जिल्ह्यातील सीलखो गावाशी संबंधित आहे. घरातून दोन लाख रुपये रोख आणि दीड लाखांचे दागिने घेऊन ही महिला प्रियकरासह फरार झाली. पीडित महिलेच्या पतीने आरोप केला आहे की, आरोपी हा संबंधीत महिलेचा काका असल्याचं सांगितलं आहे. 

पीडितेच्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सीलखो येथील रहिवासी असलेल्या पतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, झिमरावत फकिराबस येथील रहिवासी असलेल्या मुस्कान याच्याशी चार महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही कालावधीनंतर पत्नीचे झिमरावत येथील सद्दाम याच्यासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती त्याला समजली. 

लग्नाच्या एक महिन्यानंतर सद्दाम पत्नीला भेटायला आला. ज्याला गावात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. नंतर पंचायत स्तरावर घेतलेल्या निर्णयात तो गावात परत येणार नाही या अटीवर सोडून देण्यात आले. मात्र सद्दामने ऐकलं नाही आणि रविवारी रात्री पत्नीला फूस लावून पळवून नेले. या संपूर्ण घटनेत सद्दामच्या कुटुंबीयांनी त्याला पाठिंबा दिल्याचं म्हटलं आहे.

पत्नीने घरातून दोन लाख रुपयांची रोख रक्कम, दीड लाख रुपयांचे दागिने आणि मोबाईल घेऊन गेल्याचा आरोप पीडितेच्या पतीने केला आहे. सद्दाम व्यतिरिक्त हसम, मुबीना, दिनू आणि तपकन रहिवासी मुस्ताक यांचाही त्याच्या पत्नीला पळवून नेण्यात हात असल्याचं पतीने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: married niece eloped with uncle in haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.