Crime News: सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेले, मध्यरात्री फोनवर बोलू दिले नाही म्हणून पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 08:47 AM2022-11-17T08:47:00+5:302022-11-17T08:47:41+5:30

तरुणाचे लग्न सहा महिन्यांपूर्वीच झाले होते. तेव्हापासून त्यांच्यात वाद सुरु होते.

Married six months ago, wife cuts husband's private part as he was not allowed to talk on the phone in the middle of the night | Crime News: सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेले, मध्यरात्री फोनवर बोलू दिले नाही म्हणून पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला

Crime News: सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेले, मध्यरात्री फोनवर बोलू दिले नाही म्हणून पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला

googlenewsNext

राजस्थानच्या बाडमेरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या दाम्पत्यामध्ये झालेल्या वादाच्या रागातून पत्नीने पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे. पत्नीने ब्लेडने प्रायव्हेट पार्ट कापल्याचा आरोप पतीने केला आहे. यामुळे बाडमेर जिल्ह्यातील धोरीमन्ना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भलीसर गावात मोठी खळबळ उडाली होती. 

या तरुणाचे लग्न सहा महिन्यांपूर्वीच झाले होते. तेव्हापासून त्यांच्यात वाद सुरु होते. घटनेच्या रात्री पत्नी कोणाशीतरी रात्री उशिरा फोनवर बोलत होती. पती झोपला होता. त्याची झोपमोड होऊ लागल्याने त्याने पत्नीला हटकले, याचा राग आल्याने पत्नीने त्याच्याशी वाद घातला. यानंतर हा तरुण पुन्हा झोपी गेला. हे पाहून पत्नीने त्याचा प्रायव्हेट पार्टच ब्लेडने कापला. पती जोरजोरात ओरडल्याने घरातील कुटुंबीय जागे झाले आणि त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. 

बाडमेरचे एसएसपी रपतसिंह जैतावत यांनी सांगितले की, पीडित तरुणाचे लग्न झाल्यावर त्यांच्यात काही ना काही गोष्टींवरून वाद होत होते. पत्नीने त्याच्याविरोधात हुंड्यावरून त्रास देत असल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंदविला आहे. पोलीस वैद्यकीय अहवाल आला की त्यावरून कारवाई करणार आहे. याचा तपास केला जात आहे. 
 

Web Title: Married six months ago, wife cuts husband's private part as he was not allowed to talk on the phone in the middle of the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.