तीन मुलांच्या आईचं 2 तरूणांसोबत सुरू होतं अफेअर, दोघांनी मिळून उचललं धक्कादायक पाउल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 09:29 AM2023-02-23T09:29:48+5:302023-02-23T09:31:13+5:30
Crime News : पोलिसांनी सांगितलं की, पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की, महिलेचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांसाठी सगळ्यात मोठं आव्हान हे जाणून घेणं होतं की, महिला कोण आहे?
Crime News : गुजरातच्या वडोदरामधून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे दोन प्रियकरांनी मिळून आपल्या प्रेयसीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह पुलाखाली नेऊन फेकला. मीडिया रिपोर्टनुसार, महिला विवाहित होती आणि तिला तीन मुलंही आहेत. ती पतीपासून वेगळी राहत होती. पोलिसांनी घटनेचा खुलासा करत आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की, महिलेचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांसाठी सगळ्यात मोठं आव्हान हे जाणून घेणं होतं की, महिला कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी महिलेचा फोटो काही परिसरांमध्ये दाखवला. यादरम्यान पोलिसांना समजलं की, ही महिला रनौली बस स्टॅंडजवळ राहते. पोलीस तिथे पोहोचले तर घर रिकामं होतं.
घरात महिलेची कागदपत्रे सापडली ज्यात तिचं नाव चमेली होतं. तिच्यासोबत अजय यादव नावाचा एक तरूणही राहत होता. जो चार दिवसांपासून गायब होता. दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये डिसेंबरपासून राहत होते. पोलिसांना हे समजलं की, अजय यूपीचा राहणारा आहे. त्याला गावाहून लग्नाचा प्रस्ताव आला आणि तो चमेलीला सोडून आपल्या गावी गेला. यावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं.
काही दिवसांआधी चमेली प्रियकर अजय यादवचा मित्र उदय शुक्लाच्या संपर्कात आली. दोघांचे प्रेम संबंध सुरू झाले होते. दोघांनी शारीरिक संबंधही ठेवले. उदय विवाहित होता आणि चमेली त्याच्यावरही लग्नासाठी दबाव टाकत होती. यामुळे उदय वैतागला होता. त्याला चमेलीपासून पिच्छा सोडवायचा होता.
उदयने हे सगळं मित्र अजयला सांगितलं. मग दोघांनी मिळून चमेलीचा काटा काढण्याचा प्लान केला. यासाठी त्यांनी व्हॅलेंटाईन डे ची निवड केली. उदय शुक्ला आपल्या बाईकवरून चमेलीला पदमला गावातील मिनी नदीवर घेऊन गेला. जिथे अजय आधीच त्यांची वाट बघत होता. दोघांनी मिळून चमेलीचा गळा आवळला आणि मृतदेह पुलाखाळी फेकला. बऱ्याच शोधानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.