विवाहितेला कारसाठी मारहाण करून हाकलले, पुण्यातील सासरच्या ८ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 09:16 PM2022-10-04T21:16:57+5:302022-10-04T21:17:28+5:30

कार घेण्यासाठी केली ५ लाखाची मागणी, मारहाण करून हाकलले

Married woman chased for car dowry from home, FIr against 8 in-laws in Pune | विवाहितेला कारसाठी मारहाण करून हाकलले, पुण्यातील सासरच्या ८ जणांवर गुन्हा

विवाहितेला कारसाठी मारहाण करून हाकलले, पुण्यातील सासरच्या ८ जणांवर गुन्हा

Next

 लातूर : कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये घे, तुझ्या बापाला भीक लागली का म्हणून विवाहितेस मारहाण करून घरातून हाकलून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून मुरूड पोलीस ठाण्यात पुणे जिल्ह्यातील लोणीकंद गावातील सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.             

 पोलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील सारसा येथील वैष्णवी बालाजी भिसे यांचा लोणीकंद (ता. हवेली, जि. पुणे) येथील स्वप्नील नवनाथ कंद यांच्याशी फेब्रुवारी २०२२ मध्ये रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. लग्नानंतर एक महिना सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर मात्र तु मनोरूग्ण आहेस असे हिनवून वारंवार शिवीगाळ करणे, उपाशीपोटी ठेवून अपमानास्पद वागणूक सुरू केली. आपल्याला कार घ्यायची आहे तुझ्या वडिलांकडून पाच लाख रूपये घेऊन ये, तुझा बाप भिकारी आहे का, तुला आम्ही फुकट सांभाळायचे का असे म्हणत वारंवार छळ केला.

पैसे घेऊन ये नाहीतर तू घरात रहायचे नाही म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. पतीसह सासरच्या मंडळींनी कोर्या बाँडवर सही कर म्हणून दमदाटी केली मी नकार दिल्यावर मला घराबाहेर हाकलून दिल्याचे वैष्णवी स्वप्नील कंद (ह.मु. सारसा) यांनी मुरूड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार पती स्वप्नील नवनाथ कंद, संगीता नवनाथ कंद, नवनाथ वामन कंद, वनिता भारत खोंडे, शिवाजी नामदेव कंद मिना नामदेव कंद (सर्व रा. लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे) यांच्यासह ८ जणांवर गुरूवारी कलम ४९८, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Married woman chased for car dowry from home, FIr against 8 in-laws in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dowryहुंडा